IND vs NZ : संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांचे लक्ष आज मुंबई येथील सामन्याकडे असणार आहे. आज वर्ल्ड कप 2023 च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड हा सर्वात सातत्यपूर्ण खेळ दाखवणारा संघ आहे.
त्यांनी ट्रॉफी जिंकली नाहीये पण संघ सतत उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी गाठत आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघ भारताला सतत त्रास देत आहे. 2019 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. 2021 कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य फेरीतील न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासोबतच आम्ही सर्व खेळाडूंची कमजोरी आणि ताकत याविषयी देखील सविस्तर चर्चा करू.
IND vs NZ Semifinal Live: या 11 खेळाडूसह मैदानात उतरणार केन विल्यमसन
डेव्हॉन कॉनवे- डेव्हॉन कॉनवेला आयपीएलचा भरपूर अनुभव आहे. तो वेगवान आणि फिरकी या दोन्हींविरुद्ध उत्कृष्ट फलंदाज आहे. भारताविरुद्ध त्याची सरासरी ४३ आणि स्ट्राईक रेट ९३ आहे.
रचिन रवींद्र- रवींद्रने विश्वचषकात आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. भारताविरुद्धच्या गट फेरीच्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते. तो आपल्या फिरकी गोलंदाजीने भारतीय फलंदाजांनाही अडचणीत आणू शकतो.
केन विल्यमसन- केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या फलंदाजीचा शिल्पकार आहे. भारताला सामना जिंकायचा असेल तर त्याची विकेट लवकरात लवकर काढावी लागेल.
डॅरेल मिशेल- मिशेलने धर्मशाला येथे भारताविरुद्ध शतक केले आहे . कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीचा त्याने धैर्याने सामना केला. डॅरेल मिशेल या सेमीफायनल मुकाबल्यात न्यूझीलंडसातही की प्लेयर ठरू शकतो.
ग्लेन फिलिप्स- ग्लेन फिलिप्स फलंदाजापेक्षा क्षेत्ररक्षणात अधिक धोकादायक आहे. गोलंदाजीतही तो गरजेच्या वेळी विकेट घेतो.
टॉम लॅथम- विश्वचषकात विकेटकीपर फलंदाज लॅथमची बॅट अजूनही शांत आहे. पण भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ८७६ आहे. यामध्ये दोन शतके आणि 5 अर्धशतकेही आहेत.
मार्क चॅपमन- चॅपमन न्यूझीलंडसाठी फिनिशरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्याकडे मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके खेळण्याची क्षमता आहे.
मिचेल सँटनर- सँटनरने नेहमीच आपल्या अचूक रेषेने भारतीय संघाला अडचणीत आणले आहे. विराट कोहलीसाठी तो सर्वात मोठा धोका असेल.
टिम साउथी- त्याच्याकडे दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 11 वेळा रोहितला आणि 10 वेळा विराटला बाद केले आहे.
ट्रेंट बोल्ट- डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांनी भारताला नेहमीच त्रास दिला आहे. त्यात ट्रेंटचेही नाव आहे. त्याचा इनकमिंग बॉल टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरसाठी अडचणी निर्माण करू शकतो.
लॉकी फर्ग्युसन- फर्ग्युसन सध्या जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये समाविष्ट आहे. त्याचा उसळी भारतीय संघाला अडचणीत आणू शकतो.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..