IND vs NZ Semifinal: पहिल्या सेमीफायनलवर पावसाचे सावट, पावसामुळे सामना नाही झाला तर कोणता संघ पोहचेल फायनलमध्ये, घ्या जाणून समीकरण..

IND vs NZ Semifinal: पहिल्या सेमीफायनलवर पावसाचे सावट, पावसामुळे सामना नाही झाला तर कोणता संघ पोहचेल फायनलमध्ये, घ्या जाणून समीकरण..

IND vs NZ Semifinal: भारतात सुरु असलेला आयसीसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) आता संपण्याच्या जवळ आहे. यजमान भारत 16 गुणांसह अव्वल असून त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेचे स्थानही निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलियानेही अंतिम चारमधील तिकीटावर शिक्कामोर्तब केले आहे .

आणि आता जवळपास न्यूझीलंडनेही आपले चौथे स्थान पक्के केले आहे..  सध्या न्यूझीलंड चौथ्या स्थानावर असून पाकिस्तानला न्यूझीलंडला मागे टाकायचे असेल तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला चमत्कार करावा लागेल. जो जवळपास अशक्य आहे.

भारताचा एक सामना बाकी असला तरी त्यांचे अव्वल स्थान अबाधित राहील. ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध सामना खेळतील

ODI World Cup 2023 NZ vs PAK: रचीन रवींद्रने विश्वचषकात रचला इतिहास,48 वर्षात कुणीही करू शकला नव्हता अशी कामगिरी..

IND vs NZ: १५ नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल सेमीफायनल.

१५ नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुण अजूनही वर आणि खाली जाऊ शकतात. मात्र, हे दोन संघ उपांत्य फेरीत १६ नोव्हेंबरला कोलकाता येथे आमनेसामने येतील.

भारताची उपांत्य फेरी महाराष्ट्रात होत आहे. सध्या महाराष्ट्रातील हवामान वादळी आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि अवकाळी पाऊस झाला आहे, त्यामुळे भारताच्या उपांत्य फेरीतही पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना वाहून गेला तर काय होणार, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांसमोर आहे.

IND vs NZ: पावसामुळे सामना नाही झाला तर कोणाला होईल फायदा?

उपांत्य फेरीसाठी पाऊस टाळण्यासाठी आयसीसीने अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. दोन्ही उपांत्य फेरीसाठी प्रत्येकी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तथापि, राखीव दिवसांतही डकवर्थ-लुईस नियम लागू होईपर्यंत पावसामुळे षटके खेळली गेली नाहीत तर काय होईल, हा प्रश्न कायम आहे.

राखीव दिवशीही सामन्याचा निकाल लागला नाही आणि सामना रद्द झाला, तर साखळी फेरीत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. या नियमानुसार भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल. परंतु राखीव दिवस असल्यामुळे तिथपर्यंत समीकरण पोहचण्याची शक्यता फार कमी आहे. असं असलं तरीही क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा अंदाज आपण कधीही लावू शकत नाही, हेच खर..

IND vs NZ Semifinal: पहिल्या सेमीफायनलवर पावसाचे सावट, पावसामुळे सामना नाही झाला तर कोणता संघ पोहचेल फायनलमध्ये, घ्या जाणून समीकरण..

IND vs NZ:  न्यूझीलंडला बाहेर काढून भारत घेणार 2019 चा बदला.

2019 च्या टी- 20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड संघाने टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पराभूत करून फायनल खेळण्याचे स्वप्न तोडले होते. आता टीम इंडियाला या विश्वचषकात न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये पराभूत करून घरी पाठवण्याची चांगली संधी आहे.

मुख्य म्हणजे टीम इंडियाचे सर्व खेळाडू सध्या उत्कृष्ट फोर्ममध्ये आहेत. याचा फायदा टीम इंडिया नक्कीच उचलेल यात काही वाद नाही. शिवाय या विश्वचषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही सामना गमावला नसल्यामुळे टीम इंडियाचे मोनाबळ नक्कीच उंचीवर आहे. आता न्यूझीलंडला सेमिफायनलमध्ये पराभूत करून घरी पाठवणे आणि 2019 च्या टी-२० विश्वचषकाच्या पराभवाचा बदला घेण्याचे लक्ष टीम इंडिया  समोर असनार आहे.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *