IND vs NZ: हार्दिक पांड्या नंतर आणखीन एक स्टार फलंदाज झाला दुखापतग्रस्त; भारतीय संघाच्या टेन्शनमध्ये वाढ

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ)यांच्यात रविवारी (21) ऑक्टोंबर रोजी धर्मशालाच्या मैदानावर सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. शनिवारी भारतीय संघ सराव करत असताना स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला मोठी दुखापत झाली. हार्दिक पांड्या नंतर सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झालेला दुसरा खेळाडू आहे.

IND vs NZ: सामन्याच्या एक दिवस आधी सुर्यकुमार यादव दुखापतग्रस्त.

Hardik Pandya Health Update

सूर्यकुमारला झालेली दुखापत किती मोठी आहे?याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यांमध्ये तो संघात खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. नेट सेशन मध्ये सराव करत असताना सूर्यकुमार यादवच्या हाताला चेंडू जोरात लागला. त्यामुळे तो बराच वेळ वेदनेने कळवळत होता. वेदना असह्य होऊ लागल्यामुळे तो मैदान सोडून बाहेर गेला.

त्याआधी पुण्यात हार्दिक पांड्याही झाला होता जखमी.

पुण्यात बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. सध्या पांड्यावर बेंगलोर येथे उपचार सुरू आहेत. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव हा संघात खेळणार होता. मात्र तोच आता दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागेवर कोणाला संघात घ्यायचे हा संघ व्यवस्थापने पुढे पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हे दोन प्रमुख खेळाडू संघाबाहेर असल्याने जबरदस्त धक्का बसला आहे.

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दोघेही होते चांगल्या फॉर्ममध्ये .

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही चांगल्या फॉर्मत होते. त्यांचे संघात नसणे हे भारतीय संघाला परवडणारे नाही. कारण गेल्या वीस वर्षात भारताने विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला एकदाही हरवू शकला नाही. दरम्यान, भारतीय संघ नेट सेशनमध्ये सराव करत असताना युवा फलंदाज ईशान किशन याला मधमाशीने चावा घेतला. त्यामुळे तो प्रॅक्टिस सेशन मधून माघारी लवकर परतला. हार्दिक,ईशांन आणि सूर्यकुमार यादव हे तिघेही दुखापतग्रस्त झाल्यामुळे रोहित शर्मा पुढचे टेन्शन वाढले आहे.

IND vs NZ:  हार्दिक पांड्या नंतर आणखीन एक स्टार फलंदाज झाला दुखापतग्रस्त; भारतीय संघाच्या टेन्शनमध्ये वाढ

2023 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने त्यांचे सलग चार सामने जिंकले आहेत. या चार विजयासह भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे तर तितकेच सामने जिंकून न्यूझीलंडचा संघ नेट रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे. दोन्हीही संघ विश्वचषक स्पर्धेतला आपला पाचवा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. धर्मशालाच्या मैदानावर बॅट आणि बॉल मध्ये चांगला संघर्ष क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहे.

आतापर्यंत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ भारताला जरी भारी पडत असला तरी यंदाच्या स्पर्धेतील भारताचा सध्याचा परफॉर्मन्स पाहता न्यूझीलंडला भारताचा पेपर सोडवणे अवघड जाणार आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *