IND vs NZ t20 SERIES: भारताविरुद्ध 3 टी-20 सामन्यांसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, केन विल्यमनस नाही तर हा खेळाडू सांभाळणार न्यूझीलंडची कमान, 3दिग्गज खेळाडूंनाही नाही मिळाली संघात जागा..

IND vs NZ t20 SERIES: भारताविरुद्ध 3 टी-20 सामन्यांसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, केन विल्यमनस नाही तर हा खेळाडू सांभाळणार न्यूझीलंडची कमान, 3दिग्गज खेळाडूंनाही नाही मिळाली संघात जागा..
श्रीलंकेचा भारत दौरा संपल्यानंतर, न्यूझीलंड भारतीय भूमीवर 3 सामन्यांची एकदिवसीय आणि तितकीच कसोटी मालिका खेळणार आहे. पहिली एकदिवसीय मालिका 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे, तर टी-20 मालिका 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या एपिसोडमध्ये न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सर्वात लहान फॉरमॅट मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये केन विल्यमसनसह अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आलेले नाही.

न्यूझीलंडने दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता.
केन विल्यमसन, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्टसारख्या दिग्गजांना न्यूझीलंडने जाहीर केलेल्या संघात स्थान दिलेले नाही. यापूर्वी, विल्यमसनला एकदिवसीय मालिकेतही वगळण्यात आले होते, मात्र तो सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. त्याचबरोबर ट्रेंट बोल्ट केंद्रीय करारात समाविष्ट न केल्यामुळे निवडीसाठी उपलब्ध नाही.
अशा स्थितीत संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले असून, बेन लिस्टरसह हेन्री शिपली यांची प्रथमच राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. डेव्हॉन कॉनवे, इश सोधी, डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांचा अनुभवी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
असा असेल न्यूझीलंडचा T20 संघ:
Our T20 Squad to face India in 3 T20Is starting later this month in Ranchi! Congratulations to @aucklandcricket's Ben Lister and @CanterburyCrick's Henry Shipley on being selected in a BLACKCAPS T20 Squad for the first time. More | https://t.co/bwMhO2Zb76 #INDvNZ pic.twitter.com/jFpWbGPtGx
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 12, 2023
भारत आणि न्युझीलंड यांच्यातील 3 T20 सामन्यांचे वेळापत्रक
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: