रोहित-राहुलचे वाढले टेन्शन..! विश्वचषक स्पर्धेच्या मध्यंतरीच घरी परतणार भारतीय खेळाडू,बीसीसीआयकडे केली विशेष मागणी..

विश्वचषक 2023: भारताने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश सारख्या संघांना पराभूत करून विश्वचषक स्पर्धेत दिमाखात सुरुवात केली आहे. जबरदस्त फर्मात असलेल्या भारतीय संघाला आता रोखणे मुश्किल झाले आहे. कारण चार पैकी चार सामने जिंकत संघाने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. तर तितकेच सामने जिंकून न्यूझीलंड नेट रनरेटच्या आधारावर पहिल्या स्थानावर स्थान मिळवले.

विश्वचषक 2023: उद्या न्यूझीलंडशी भिडणार भारतीय संघ

world cup 2023: किती सामने जिंकल्यावर भारत पोहचू शकतो विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये: वाचा ही महत्त्वपूर्ण बातमी!

भारताचा पुढचा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाळाच्या मैदानावर रविवारी होणार आहे. त्या सामन्यानंतर भारतीय संघाचा पुढचा सामना 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध लखनऊच्या मैदानावर होणार आहे. दोन सामन्यामध्ये तब्बल एक आठवड्यांचा गॅप आहे. खेळाडू रिलॅक्स होण्यासाठी घरी परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा भारतीय संघ 26 तारखेला लखनऊमध्ये दाखल होईल. या वृत्ताला बीसीसीआय कडून अद्याप दुजोरा आला नाही.

विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये मानसिक ताण-तणाव येऊ नये व परिवारासोबत थोडा वेळ घालवता यावा, यासाठी खेळाडूंनी संघ व्यवस्थापनेकडे घरी जाण्याची परवानगी मागितली आहे. भारतीय खेळाडूंना बीसीसीआय कडून घरी जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर
.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी

विश्वचषक स्पर्धेत प्रमुख संघातील खेळाडूंना दुखापतीने घेरले आहे. त्यात आता भारतीय संघाला देखील या दुखापतीचे ग्रहण लागले आहे. हार्दिक पांड्या हा बांगलादेश विरुद्धच्या सामन्यांमध्ये जखमी झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली असून तो अजूनही लंगडत चालत आहे. उपचार घेण्यासाठी पंड्या बेंगलोरला गेला आहे. पांड्या फार्मात असल्याने त्याचे संघात न खेळणे हे भारतीय संघाला मोठा धक्का बसण्यासारखे आहे.

यंदाची विश्वचषक स्पर्धा ही भारतात होत असल्याने भारताला पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याची संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे भारताचे सर्व खेळाडू हे जबरदस्त फॉर्मत आहेत. भारतीय खेळाडू फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात शंभर टक्के योगदान देत आहेत. चारही सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे. 2011 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माला खराब फॉर्ममुळे संघात स्थान मिळवता आले नाही. मात्र यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

हार्दिक पांड्या विश्वचषक 2023:

आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाला पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवून देण्यात कर्णधार रोहित शर्मा चा मोठा वाटा आहे. सध्या रोहित भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यासाठी सर्वतो प्रयत्न करत आहे. भारताने विश्वचषक जिंकल्यास कपिल देव, महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर रोहित शर्मा संघाला विश्वचषक जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरेल.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *