IND vs NZ : उद्यापासून सुरु होतेय 3 एकदिवशीय सामन्यांची मालिका.. पहिल्या सामन्यात या 10 खेळाडूंना कर्णधार रोहित शर्मा करू शकतो संघात सामील, असा असेल भारतीय संघ..

IND vs NZ : उद्यापासून सुरु होतेय 3 एकदिवशीय सामन्यांची मालिका, पहिल्या सामन्यात या 10 खेळाडूंना कर्णधार रोहित शर्मा करू शकतो संघात सामील, असा असेल भारतीय संघ..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १८ जानेवारीपासून बुधवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय उप्पल स्टेडियमवर होणार आहे. याआधी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली होती. टीम इंडियाची खरी परीक्षा या मालिकेत होणार आहे कारण न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेपेक्षा बलाढय़ आहे.
संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसन या मालिकेत खेळत नसला तरी टॉम लॅथम हा सुद्धा एकदिवशीय मालिकेत कमी नाहीये.

भारतीय संघासाठी ही एक गोष्ट चांगली आहे की, न्यूझीलंड संघाला अद्याप भारतात एकही वनडे मालिका जिंकता आलेली नाही. वनडे मालिकेत दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही 17 वी वेळ असेल. पण हे देखील विसरता कामा नये की टीम इंडियालाने न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या शेवटच्या मालिकेत 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणूनच ब्लू टीम साठी किविंचे आव्हान सोपे नसणार आहे. खर्या अर्थाने आपण असेही म्हणू शकतो की येथूनच टीम इंडियाच्या विश्वचषकाची खरी तयारी सुरू होईल.
एकदिवसीय मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पहावे?
तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका देखील पाहू शकता. दुसरीकडे, डिजिटल प्लॅटफॉर्मवर, तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. सामन्यांचीसुरवात भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून सुरू होईल, नाणेफेक अर्धा तास आधी दुपारी 1 वाजता होईल.
एकदिवसीय सामने कुठे खेळवले जातील?
भारत आणि न्यूझीलंड वनडे मालिकेतील तीन सामने 18 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान होणार आहेत. पहिला सामना 18 जानेवारीला हैदराबादमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये आणि तिसरा सामना 24 जानेवारीला इंदोरमध्ये होणार आहे.
भारत-न्यूझीलंड असे असतील वनडे संघ
My playing XI for ind vs nz first ODI–
Rohit
Gill
Virat
Ishan
Sky
Hardik
Sundar
Kuldeep
Shardul/Umran
Shami
Siraj#INDvNZ #ODIs #SuryakumarYadav #INDvsNZ— N. Goswami (@Ngoswami99) January 17, 2023
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
न्यूझीलंड: टॉम लॅथम (क), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, अॅडम मिल्ने, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, हेन्री शिपले, ईश सोधी , ब्लेअर टिकनर.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…