IND vs NZ: टीम इंडियाचे ‘हे’ 5 खेळाडू चालले तर भारत पोहचणार फायनलमध्ये, न्यूझीलंडचा करू शकतात सहज पराभव.

IND vs NZ: भारतीय संघ विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संघाचा सामना न्यूझीलंडशी (IND vs NZ) होत आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व 9 सामने जिंकले होते.

दुसरीकडे, किवी संघाने 5 विजयांसह उपांत्य फेरी गाठली आहे. यानंतरही हा सामना चुरशीचा होईल, अशी अपेक्षा आहे. नॉकआऊटमधील भारताचा अलीकडचा विक्रम फारसा अनुकूल नाही. पण आजच्या सामन्यात टीम इंडियाचे हे 5 खेळाडू चांगली कामगिरी करू शकले तर न्यूझीलंडचे फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न भंगू शकते.  चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते 5खेळाडू.

IND vs NZ: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू चालले तर भारत पोहचणार फायनलमध्ये, न्यूझीलंडचा करू शकतात सहज पराभव.

IND vs NZ: टीम इंडियाचे हे 5 खेळाडू चालले तर भारत पोहचू शकतो फायनलमध्ये..

1.रोहित शर्मा (Rohit Sharma)

World Cup 2023: विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत ठोकले गेलेत सर्वाधिक षटकार, या संघाने ठोकलेत सर्वाधिक षटकार..

रोहित शर्माच्या वर्ल्ड कप 2023 मध्ये 500 पेक्षा जास्त धावा आहेत.  टीम इंडियाचा कर्णधार सध्या जबरदस्त फोर्ममध्ये आहे. सुरवातीपासूनच विरोधी संघाच्या गोलंदाजावर हल्ला करत संघाला चांगली सुरवात करून देण्याचा रोहितचा मानस स्पष्ट आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित ने जबरदस्त सुरवात करून दिली तर संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल.

2.जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज  जसप्रीत बुमराह नेहमीच बॅटिंग पॉवरप्लेमध्ये फलंदाजांना बांधून ठेवतो. त्याच्या अचूक लाईनने तो कोणालाही मोकळेपणाने खेळू देत नाही. स्पर्धेतील त्याची इकोनोमी केवळ 3.65 आहे.

IND vs NZ

एक विकेट घेण्यासाठी तो फक्त 16 धावा खर्च करतो. डेथ ओव्हर्समध्येही तो फलंदाजांना वर्चस्व गाजवू देत नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या सेमिफायनल सामन्यात बूमराहच्या कामगिरीवर भारतीय संघाचं भवितव्य नक्कीच अवलंबून असणार आहे.

३.मोहम्मद शमी (Mohmmad Shami)

नेदरलँडविरुद्धचा सामना शमीसाठी काही खास नव्हता. मात्र त्याआधी प्रत्येक सामन्यात शमी चांगल्या लयीत होते. शमीने आतापर्यंत 5 सामन्यात 9.5.6 च्या सरासरीने 16 बळी घेतले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शमीची गोलंदाजी चालने भारतीय संघास्ठी महत्वाच आहे.

4.विराट कोहली (Virat Kohli)

IND vs NZ

विराट कोहलीची चांगली वाटचाल ही भारताच्या विजयाची हमी आहे. सध्या तो वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विराटची नजर त्याच्या 50व्या वनडे शतकावरही आहे. मधल्या षटकांमध्ये डाव चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. भारतीय संघाची संपूर्ण फलंदाजी विराटभोवती फिरते म्हणूनच या सामन्यात विराट च्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

5.कुलदीप यादव (Kuldeep Yadav)

टीम इंडियाचे सर्व खेळाडू सध्या चमत्कार करत आहेत. मात्र कुलदीप यादवच्या बाबतीत न्यूझीलंडला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. काही काळापूर्वीपर्यंत संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडणारा कुलदीप एकामागून एक विकेट घेत आहे.

मधल्या षटकांमध्ये कुलदीप हे रोहित शर्माचे सर्वात मोठे हत्यार आहे. आणि न्यूझीलंडविरुद्ध कुलदीपची कामगिरी खूपच भारीय. त्यामुळे आजच्या सेमिफायनल मुकाबल्यात कुलदीपच्या कामगिरीवर सुद्धा सर्वांचे लक्ष असेल.

वरील सर्व खेळाडूंनी आपापल्या लौकिकाला साजेशी खेळी केली तर टीम इंडिया नक्कीच या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम सामन्यात धडक मारेल, हे नक्की..


  • हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *