इंग्लंडकडूनच नाही तर याआधीही भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये १० विकेट्सनी पराभूत झालाय..
गुरुवारचा वार. टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भर आणि इंग्लंड यांचा सामना रंगला . आणि इंग्लंडने अतिशय लज्जास्पदरित्या भारतीय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करतांना भारतीय संघाने २० षटकात १६८ धावा काढल्या आणि इंग्लंड समोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष ठेवले.प्रत्युतरात इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवत हा सामना तब्बल १० गडी राखून खिशात घातला. यासोबतच इंग्लंड विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये जाणारा दुसरा संघ ठरला.
आणि भारतीय संघाचे या पराभवासोबत वर्ल्डकपमधी ल आव्हान देखील संपुष्टात आले आहे. तब्बल १० विकेट्सनी प्रभाव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघ चांगलाच ट्रोल होत आहे. मात्र विश्वचषकात हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये. याआधीही सुद्धा भारतीय संघ विश्वचषक सामन्यातच तब्बल १० विकेट्सनी पराभूत झाला होता. जाणून घेऊया त्या किस्स्याब्द्दल.
Aur inhe lgta tha Kami iske captaincy mai thii..Feel for this man kohli @imVkohli #chokers pic.twitter.com/n1KdV9RrCi
— Md ShÀYeQ HUSsAIn (@MdShayeq) November 10, 2022
तो वर्ल्डकप होतो २०२१चा म्हणजे एका वर्षपूर्वीचा. दिवस २४ ऑक्टोबर २०२१ . दुबई मध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांचा ग्रुप स्टेज सामना या दिवशी दुबईमध्ये खेळवला गेला.प्रथम फलंदाजी करतांना भारतीय संघाने २० शतकात १५१ धावा काढल्या. ज्यात विराट कोहलीने ५७,रिषभ पंत ने ३९ आणि रवींद्र जडेजाने १३ धावांचे योगदान दिले होते. दुबईच्या स्टेडियमवर गोलंदाजाना मदत मिळत होती, त्यामुळे या स्कोरवर एक चांगला सामना पाहायला मिळेल असा चाहत्यांचा अंदाज होता, अंतर प्रत्येक्षात काही वेगळचं घडले.
लक्षाचा पाठलाग करण्यास उतरलेले पाकिस्तानचे सलामीवीर मोहमद रिजवान आणि बाबर आझम यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरवात केली. आणि अवघ्या १७ षटकात हा सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाचे ७ गोलंदाज मिळून तेव्हाही पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला बाद करू शकले नवते. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाबाद ६८ तर सलामीवीर मोहम्मद रिजवानने नाबाद ७९ धावा काढल्या होत्या. आजही या सामन्याच्या आठवणी भारतीय चाहत्यांच्या मनामध्ये रुतून आहेत. आणि ठीक एक वर्षानंतर आज पुन्हा महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडसमोर अपयशी ठरलाय.

इंग्लंडसमोर भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्याने याचा सर्वांत मोठा फटका भारतीय संघाला असा बसलाय की, वर्ल्डकप स्पर्धेत दोन वेळा १० विकेट्सनी पराभूत होण्याचा नकोसा विक्रम भारतीय संघाच्या नावावर झालाय. वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत भारत सोडून दुसरा कोणताही संघ दोन वेळा १० विकेट्सनी पराभूत झाला नाहीये. त्यामुळेच आजचा इंग्लड आणि पाकिस्तानने केलेले हे दोन पराभव भारताला यापुढेही टोचत राहणार हे मात्र नक्की..
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..