IND vs Pak live: रोहित शर्माने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, ईशान बाहेर तर शुभमनची संघात वापसी, पहा दोन्ही संघाच्या प्लेईंग 11

IND vs Pak live

 

IND vs Pak live: विश्वचषक 2023 मधील सर्वांत मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ आणि पाकिस्तानचा संघ दोघेही याआधी विश्वचषकातील त्याचं दोन्ही सामने जिंकून आले आहेत. आज एक  कोणता तरी संघ पराभूत होणार हे मात्र नक्की.. भारतीय क्रिकेट चाहत्यांचा उत्साह मात्रआता शिगेला पोहचला आहे.

नाणेफेक जिंकून रोहित शर्माने घेतला गोलंदाजीचा निर्णय, शुभमन गिलची इंट्री.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, शिवायभारतीय संघामध्ये क मोठा बदलही करण्यात आला आहे. यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन प्लेईंग 11 मधून बाहेर असून शुभमन गिलचे संघात पुनरागमन झाले आहे. याआधी डेंगूमुळे शुभमन गिल दोन्ही सामने खेळू शकला नव्हता. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तो पूर्णपणे फिट झाला असून संघात दाखल झाला आहे.

विश्वचषकात आतापर्यंत एकदाही पाकिस्तानकडून पराभूत झाला नाही भारतीय संघ.

दोन्ही संघाच्या आतपर्यंतच्या विश्वचषकातील सामन्याबद्दल बोलायचं झाल तर, टीम इंडिया आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेमध्ये एकदाही पाकिस्तान कडून पराभूत झालेली नाहीये. आतापर्यंत दोन्ही संघामध्ये 7 सामने झाले असून सर्वच सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. असं असल तरी सध्या पाकिस्तान संघ खूप चांगल्या लयीमध्ये आहे. आणि पाकिस्तान नक्कीच आपली सर्व ताकत लावून विश्वचषक सामन्यात टीम इंडियाविरुद्ध आपला पहिला विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असेल.

IND vs Pak live

भारतीय संघाची प्लेईंग 11

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज


ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..