Ind vs Pak: 2023 च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्या झालेल्या सामन्यात भारताने बाजी मारली आहे. विश्वचषकात भारताचा पाकिस्तान विरोधात हा सलग आठवा विजय आहे. या प्रत्येक विजयात कोणत्यातरी भारतीय खेळाडूंचा मोठा वाटा असतो. म्हणून त्याला त्याच्या बहारदार कामगिरीमुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला जातो. 1992 ते 2023 या कालावधीत कोण कोणत्या खेळाडूंना ‘मॅन ऑफ द मॅच‘ चा पुरस्कार मिळाला आहे, त्याची माहिती पुढील प्रमाणे.
Ind vs Pak: भारत पाकिस्तान यांच्यातील आजवरच्या विश्वचषक सामन्यात सामनावीर (मॅन ऑफ द मॅच) पुरस्कार मिळवणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर: सन 1992 मध्ये भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) संघ प्रथमच विश्वचषकात सिडनीच्या मैदानावर भिडले. स्टार खेळाडूंनी भरलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानचा पहिल्यांदा विश्वचषकात पराभव केला.भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा पहिला विश्वचषक होता. त्याने 62 चेंडूत नाबाद 54 धावांची मॅच विनिंग खेळी केली. या बहारदार कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा किताब देऊन गौरवण्यात आले.
नवज्योत सिंग सिद्धू:1996 साली भारत आणि पाकिस्तानचा (Ind vs Pak) पुन्हा एकदा क्वार्टर फायनल मध्ये आमना-सामना झाला. सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू याने पाकिस्तानच्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवत 115 चेंडूत 93 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारत आणि हा सामना 39 धावांनी जिंकला. शतकवीर सिद्धूला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला.
व्यंकटेश प्रसाद : 1999 साली पुन्हा भारताने मँचेस्टरचे मैदान मारले. भारताने विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध (Ind vs Pak) सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने भेदक मारा करत 27 धावा देऊन पाच गडी बाद केले. आणि भारताला 47 धावांनी विजय मिळवून दिला. व्यंकटेश प्रसादला त्याच्या ‘मॅच विनिंग स्पेल’मुळे मॅन ऑफ द मॅच देण्यात आले.
सचिन तेंडुलकर: दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन मैदानावर 2003 साली भारत – पाकिस्तान (Ind vs Pak) चौथ्यांदा विश्वचषकात एकमेकाविरुद्ध भिडले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चौफेर फटके बाजी करत पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजाच्या नाकात दम आणला. अवघ्या 75 चेंडूमध्ये 98 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
सचिन तेंडुलकर: 2011 साली भारत पाकिस्तान (Ind vs Pak) यांचा सामना मोहालीच्या मैदानावर झाला. सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत 115 चेंडू 85 धावांची मॅच विनिंग खेळी केली. भारत आणि हा सामना देखील 29 धावांनी आपल्या खिशात घातला. सचिनच्या अर्धशतकी खेळीमुळे त्याला सामनावीरचा किताब देण्यात आला. तो सलग दोन विश्वचषकात मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
most man of the match in worldcup
विराट कोहली: 2015 ऑस्ट्रेलियातील एडिलेडमध्ये झालेल्या विश्वचषकात विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध (Ind vs Pak) पहिले शतक ठोकले. विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकणारा कोहली पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने 126 चेंडूत 107 धावांची अविश्वासनीय खेळी केली. भारत 76 धावांनी हा सामना जिंकला.
image courtesy- Insta-Rohit sharma
रोहित शर्मा: इंग्लंड मध्ये 2019 साली झालेल्या सामन्यात रोहित शर्मा ने 113 चेंडूत 140 धावांची धडाकेबाज खेळी केली. डखवत लुईस (DSL) नियमानुसार हा सामना भारताने 89 धावांनी जिंकला. भारताचा विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध हा सलग सातवा विजय आहे.
2023 च्या विश्वचषकात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताचा हुकमी एक्का वेगवान गोलंदाज ‘जसप्रीत बुमराह’ याला सामनावीरचा किताब देऊन गौरवण्यात आले. त्याने सात षटकात 19 धावा ते दोन महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तसेच एक षटक निर्धाव टाकण्यात ही तो यशस्वी झाला.