IND vs PAK: महामुकाबल्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, शुभमन गिल नंतर हा दिग्गज खेळाडूही संघातून होणार बाहेर, समोर आले मोठे कारण..

Untitled 1 30

IND vs PAK: महामुकाबल्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, शुभमन गिल नंतर हा दिग्गज खेळाडूही संघातून होणार बाहेर, समोर आले मोठे कारण..


IND vs PAK: भारतामध्ये सध्या एकदिवशीय विश्वचषक (odi world cup 2023) स्पर्धा खेळवली जात आहे. टीम इंडियाने आतापर्यंत २ सामने  खेळले असून दोन्हीही सामने संघाने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामण्यात सुद्धा टीम इंडियाने मोठा विजय मिळवत नेट रनरेट मध्ये मोठी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाचा तिसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणारा पाकिस्तान संघासोबत (IND vs PAK) 14 ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तान संघ सुद्धा शानदार फोर्ममध्ये आहे त्यांनीही आपले सुरवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे 14 तारखेला होणारा भारत विरुद्ध  पाकिस्तान (IND vs PAK) हा सामना रंगतदार होणार हे मात्र नक्की.

AFG vs IND:.. म्हणून सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूने 2 मिनिट मौन पाळत शोक व्यक्त केला, जाणून घ्या कारण..

मात्र, भारत पाकिस्तान  या सामन्याआधी भारतीय संघाला आता एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जखमी झाला आहे. ज्यामुळे तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नक्की कण आहे तो खेळाडू जाणून घेऊया अगदी सविस्तर..

मोहम्मद सिराज  IND vs PAK

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज जखमी.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा गोलंदाज ‘मोहम्मद सिराज’ महागडा ठरला. त्याने या सामन्यात खूप धावा दिल्या. मात्र याच वेळी शेवटचे शतक टाकतांना टीम इंडियाचा हा गोलंदाज जखमी झाला आहे. सिराज भारतीय जलद गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख हिस्सा आहे. ज्यामुळे तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात न खेळल्यास संघावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

IND vs PAK: सिराजच्या जागी ‘हा’ गोलंदाज होऊ शकतो टीम इंडियामध्ये दाखल.

टीम इंडियाचा पुढचा सामना आता 14 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. विश्वचषकाच्या आजपर्यंतच्या इतिहासात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध फक्त एकच विजय नोंदवला आहे आणि यावेळीही टीम इंडिया ही विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

IND vs PAK: महामुकाबल्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, शुभमन गिल नंतर हा दिग्गज खेळाडूही संघातून होणार बाहेर, समोर आले मोठे कारण..

हे लक्षात घेऊन टीम इंडियाचे व्यवस्थापन मोहम्मद सिराजच्या जागी रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करू शकते. मोहम्मद सिराज ऐवजी अश्विन संघात आल्यास तो गोलंदाजी आणि वेळ पडल्यास फलंदाजी दोन्ही मध्ये आपले चांगले योगदान देऊ शकतो.

पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात व्यवस्थापन मोहम्मद सिराजच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी देऊ शकते. रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अतिशय चमकदार आहे आणि त्याने संपूर्ण कारकिर्दीत टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. याशिवाय त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यातही चांगली कामगिरी केली होती. रविचंद्रन अश्विनची ही कामगिरी लक्षात घेऊन व्यवस्थापन त्याच्या अनुभवाला प्राधान्य देऊन सिराज फिट न झाल्यास अश्विनला मैदानात पाठवू शकतात.

मोहम्मद सिराज IND vs PAK

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.


PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..