IND vs PAK: विश्वचषक 2023 मधील सर्वांत मोठा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होईल. विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत सात वेळा एकमेकाविरुद्ध भिडले आहेत. सातही सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारत विजयाची लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येईल तर पाकिस्तान विश्वचषकात भारताविरुद्ध पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येईल.
सध्या दोन्हीही संघ तुफान फार्मात आहेत. विश्वचषकात दोन्ही संघाचा हा प्रत्येकी तिसरा सामना आहे. दोन्ही संघानी आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत.

भारताने अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे तर पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे.
IND vs PAK: भारतीय संघात होणार होऊ शकतात मोठे बदल .
भारताच्या प्लेइंग इलेव्हन बाबतीत बोलायचे झाले तर, आजच्या सामन्यात ईशान किशनच्या ऐवजी शुभमन गिल खेळताना दिसून येईल. त्याचा हा विश्वचषकातील पहिला सामना असू शकतो. ईशान किशनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील सामन्यात 47 धावा केल्या होत्या. गिलच्या पुनरागमनामुळे ईशान किशन बाहेर बसू शकतो तसेच भारतीय संघ तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज खेळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूरच्या ऐवजी मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. सिराज, शमी आणि बुमराह ही वेगवान गोलंदाजाची फळी पाकिस्तान संघाचे कंबरडे मोडण्यासाठी तयार आहे.

या सामन्यापूर्वी आयसीसी ने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले आहे. या कार्यक्रमात चाहत्यांना अरिजीत सिंह, सुखविंदर सिंह आणि शंकर महादेवन यांच्या आवाजातली गाणी ऐकायला मिळणार आहेत.
या सामन्याविषयी चाहत्यांमध्ये कामालाची उत्सुकता दिसून येत आहे. या सामन्यासाठीची सारी तिकिटे विकली गेली असून एक लाखापेक्षा अधिक प्रेक्षक या सामन्या पाहण्यासाठी मैदानात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सामन्यात दोन्ही संघांवरती प्रचंड दबाव असणार आहे. मायदेशात खेळताना भारताला स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. तर एक लाख लोकसंख्येच्या उपस्थितीत चांगले प्रदर्शन करण्याचा दबाव पाकिस्तानवर देखील असणार आहे.
IND vs PAK: पाकिस्तान संघात होणार बदल?
भारतात दोन्ही संघ आतापर्यंत तीस वेळा एकमेका विरुद्ध भिडले आहेत. यात भारताने 11 वेळा तर पाकिस्तान 19 वेळा विजय मिळवला आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताला कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा दमदार खेळी करावी लागणार आहे. विश्वचषकात पहिल्यांदा विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या शाहीनशहा आफ्रिदी, हरीश राऊफ, हसन अली यांना चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आज होणाऱ्या या सामन्यात भारताचे स्टार फलंदाज आणि पाकिस्तानचे घातक गोलंदाज असा रोमांच पाहायला मिळेल.
अहमदाबाद मध्ये आज शनिवारी दुपारनंतर पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज दर्शवला आहे. जर या सामन्यात पाऊस पडला तर चहात्यांची घोर निराशा होणार आहे.
IND vs PAK: दोन्ही संघाचे संभावित प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन/शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/ रविचंद्रन अश्विन.
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार ), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन शाह आफरीदी, हारिस रऊफ.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..