IND vs SA :दक्षिण आफ्रिकेत पोहचलेल्या टीम इंडियासोबत घडला किस्सा; स्वतःच डोक्यावर घेऊन जाव लागलं आपलं सामान, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IND vs SA :दक्षिण आफ्रिकेत पोहचलेल्या टीम इंडियासोबत घडला किस्सा; स्वतःच डोक्यावर घेऊन जाव लागलं आपलं सामान, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

 

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात १० डिसेंबरपासून द्विपक्षीय मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने आधीच संघ जाहीर केला आहे. त्यांनी प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार नेमले आहेत.

या मालिकेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पाऊल ठेवले. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND vs SA: तीन वेगवेगळ्या फोर्मेटमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार, मात्र 'या' 3 खेळाडूंनाच मिळाली सर्व फोर्मेटमध्ये संधी..

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पाऊल ठेवले.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. बुधवारी त्यांनी परदेशी भूमीवर पाऊल ठेवले. विमानतळावर खेळाडूंनी उपस्थित चाहत्यांसोबत सेल्फी काढले. तिथून निघाल्यानंतर डर्बनमध्ये पावसामुळे इशान किशनसारख्या काही खेळाडूंनी सामान डोक्यावर ठेवलं.

हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी भारतीय संघाचे जोरदार स्वागत केले. हॉटेलचे सर्व कर्मचारी टाळ्या वाजवताना दिसले, तर टीम इंडियाच्या खेळाडूंनीही आभार व्यक्त केले. यावेळी हॉटेलमध्ये काही सजावटही करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

उद्यापासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शुभमन गिलला खास विक्रम करण्याची संधी, विराट कोहलीला सोडू शकतो मागे..

IND vs SA: टीम इंडिया रविवारी पहिला T20 सामना खेळणार .

IND vs SA :दक्षिण आफ्रिकेत पोहचलेल्या टीम इंडियासोबत घडला किस्सा; स्वतःच डोक्यावर घेऊन जाव लागलं आपलं सामान, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) रविवारी 10 डिसेंबर रोजी डर्बन येथे पहिल्या T20 सामन्यात आमनेसामने होतील. टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती असेल. दुसरीकडे, एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारतीय संघाने अलीकडेच पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने पराभव केला. अशा परिस्थितीत परदेशातही अशीच कामगिरी करण्यास ती उत्सुक असेल. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *