IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने केला भारताचा 5 गडी राखून पराभव, रिंकू सिंह- सूर्याची खेळी पावसामुळे गेली वाया..

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने केला भारताचा 5 गडी राखून पराभव, रिंकू सिंह- सूर्याची खेळी पावसामुळे गेली वाया..

IND vs SA 2nd T20I : पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या T20I मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम खेळताना भारताने रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर १९.३ षटकांत १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला आणि दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले, जे यजमान संघाने सात चेंडू राखत आणि पाच गडी गमावून पूर्ण केले.

90 चेंडूत 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्याच चेंडूपासून दमदार सुरुवात केली. सिराजच्या पहिल्या षटकात 14 धावा आणि त्यानंतर अर्शदीप सिंगच्या षटकात 24 धावा झाल्या. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या अवघ्या दोन षटकांत 38 धावांपर्यंत पोहोचली. यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांनी मागे वळून पाहिले नाही आणि वेगाने धावा करत राहिल्या. अशा प्रकारे आफ्रिकेने 13.5 षटकांत 5 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.

IND vs SA LIVE:  दुसरा टी-२० सामनाही जाणार पावसात वाहून? दुपार पासून पावसास सुरवात; पाउस न थांबल्यास कमी षटकांचा होऊ शकेल सामना..

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला सामना आपल्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे अजिबात जाणवले नाही, परंतु 10व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हेनरिक क्लासेनची विकेट पडल्यानंतर आफ्रिका बॅकफूटवर गेली आणि सामना गमावला.भारत नियंत्रणात येऊ लागले. पण एकदा आफ्रिकेने सामना स्वतःकडे खेचला आणि जिंकला.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. मॅथ्यू ब्रिट्झकेच्या रूपाने संघाने 2.5 षटकांत पहिली विकेट गमावली, परंतु तोपर्यंत आफ्रिकेने 41 धावा फलकावर लावल्या होत्या. ब्रित्झकेने 7 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 16 धावांची छोटी पण आक्रमक खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी रीझा हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्कराम यांनी 30 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली.

आफ्रिकेला दुसरा धक्का 8 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कर्णधार मार्करामच्या रूपाने बसला, त्याने 17 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 30 धावा केल्या. मुकेश कुमारने मार्करामला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर 9व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवने आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला 49 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हेंड्रिक्सने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला.

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने केला भारताचा 5 गडी राखून पराभव, रिंकू सिंह- सूर्याची खेळी पावसामुळे गेली वाया..

त्यानंतर 10व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हेन्रिक क्लासेन 07 धावा काढून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. क्लासेनच्या छोट्या खेळीत 1 षटकारांचा समावेश होता. या विकेटनंतर सामना आफ्रिकेच्या हातातून निसटत असल्याचे दिसत होते, पण त्यानंतर त्यांनी पुनरागमन केले. यानंतर डेव्हिड मिलर 13व्या षटकात 17 धावा काढून बाद झाला. आफ्रिकेने विजय मिळेपर्यंत ट्रिस्टन स्टब्स १४ धावांवर नाबाद राहिले आणि अँडिले फेहलुकवायो १० धावांवर नाबाद राहिले.

IND vs SA: भारतीय गोलंदाजी अशी होती.

भारतीय गोलंदाजांना 15 षटकात 152 धावा करता आल्या. संघाकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 2 बळी घेतले. यादरम्यान त्याने 3 षटकात 34 धावा दिल्या. याशिवाय मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. सिराजने 3 षटकांत 27 धावा तर कुलदीपने 3 षटकांत 26 धावा दिल्या.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *