IND vs SA 2Nnd test live: टीम इंडियाने रचला इतिहास…31 वर्षाचा दुष्काळ संपवत दक्षिण आफ्रिकेत मिळवला विजय.

IND vs SA 2Nnd test live: टीम इंडियाने रचला इतिहास...31 वर्षाचा दुष्काळ संपवत दक्षिण आफ्रिकेत मिळवला विजय.

IND vs SA : भारतीय संघाने केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवानंतर टीम इंडिया मागे पडली होती. आता 7 विकेट्सने शानदार विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेतील पराभवापासून स्वतःला वाचवले. भारतीय संघाला ही मालिका जिंकता आली नसली आणि पुन्हा एकदा आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र केपटाऊनमधील या विजयासह भारताने इतिहास रचला आहे. तसेच, केपटाऊनमध्ये केवळ भारतच नाही तर कोणत्याही आशियाई संघाने येथे कसोटी सामन्यात आफ्रिकेचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कारण 1993 नंतर प्रथमच भारतीय संघाला येथे विजय मिळवता आला आहे. म्हणजेच येथील विजयाची तीन दशकांची प्रतीक्षा संपली आहे. भारतीय संघाने 2 जानेवारी 1993 रोजी येथे पहिली कसोटी खेळली आणि ती हरली.तेव्हापासून या संघाने एकूण 6 सामने खेळले असून  त्यापैकी चार सामने हरले असून दोन सामने अनि र्णित राहिले. आता सातव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदाच या मैदानावर विजय मिळवला आहे. अशाप्रकारे या मैदानावर तिरंगा फडकवत भारतीय संघाने केपटाऊनची शान मोडून काढत पहिला कसोटी विजय मिळवला.

IND vs SA :केपटाऊनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी आजपर्यंतचे निकाल.

  1. वर्ष 1993 – कसोटी सामना अनिर्णित
  2. वर्ष 1997 – भारत 282 धावांनी हरला
  3. वर्ष 2007 – भारत 5 विकेटने हरला
  4. वर्ष 2011 – सामना अनिर्णित संपला
  5. वर्ष २०१८- भारत ७२ धावांनी हरला
  6. वर्ष 2022- भारत 7 गडी राखून हरला
  7. वर्ष 2024- भारत 7 गडी राखून जिंकला

IND vs SA : सामन्याचे थोडक्यात वर्णन..

IND vs SA 2Nnd test live: टीम इंडियाने रचला इतिहास...31 वर्षाचा दुष्काळ संपवत दक्षिण आफ्रिकेत मिळवला विजय.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने धुमाकूळ घातला, 15 धावांत 6 बळी घेतले आणि संपूर्ण आफ्रिकन संघ 55 धावांत पव्हलियन मध्ये पो मध्ये यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 153 धावा केल्या आणि 98 धावांची आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात भारतासाठी आश्चर्यकारक कामगिरी करत 6 विकेट घेतल्या. या डावात आफ्रिकेचा संघ १७६ धावांत गारद झाला. भारतासमोर  असलेले ७९ धावांचे लक्ष्य ३ विकेट्स गमावून पूर्ण केले.आणि अश्या पद्धतीने भारताने मालिका १- १ अशी  बरोबरीत सोडवली.


हेही वाचा:

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *