IND vs SA: आज पार्ल मध्ये खेळवला जाणार अंतिम सामना, सिरीज जिंकण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवश्यक; पहा कसी असेल खेळपट्टी? प्लेईंग 11

IND vs SA 3rd ODI: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. जिथे 3 सामन्यांची एकदिवशीय मलिका खेळवली जात आहे.  भारत आणि दक्षिण आफ्रिका(IND vs SA)यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज पार्ल येथे खेळवला जाणार आहे. हा सामना कोणताही संघ जिंकेल, तो मालिका २-१ ने जिंकेल.

अशा स्थितीत दोन्ही संघांना हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायचा आहे. भारतीय संघाला तिसरा सामना जिंकायचा असेल, तर सलामीच्या जोडीला चांगल्या धावसंख्येचा पाया रचावा लागेल.

सलामीवीर साई सुदर्शनला बाजूला ठेवून दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाड दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरला. अशा स्थितीत तिसर्‍या सामन्यातील त्याची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.आतापर्यंत मालिकेतील दोन्ही सामने खूपच कमी धावसंख्येचे होते. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका अवघ्या 116 धावांवर ऑल आऊट झाली होती, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया 211 धावांवर ऑलआऊट झाली होती. तिसरा आणि अंतिम सामना तरी उच्च धावसंखेसह होईल, अशी चाहत्यांना आशा आहे.

IND vs SA 3rd ODI: खेळपट्टीचा अहवाल (Pitch Report)

तिसरा एकदिवसीय सामना बोलंड पार्कच्या खेळपट्टीवर खेळवला जाईल. बोलंड पार्कची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. अशा स्थितीत चाहत्यांना तिसऱ्या सामन्यात उच्च स्कोअरची अपेक्षा आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक संधी मिळाल्या आहेत. दुसरीकडे या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला नाही.

भारतीय संघाने या मैदानावर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत दोन एकदिवसीय सामने खेळले होते आणि दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत आता टीम इंडिया हा विक्रम सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. या खेळपट्टीची सरासरी धावसंख्या 250 मानली जाते. अशा परिस्थितीत जो संघ प्रथम फलंदाजी करेल त्याला 250 पेक्षा थोडे अधिक धावा करायला आवडतील.

IND vs SA: आज पार्ल मध्ये खेळवला जाणार अंतिम सामना, सिरीज जिंकण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवश्यक; पहा कसी असेल खेळपट्टी? प्लेईंग 11

IND vs SA 3rd ODI: हवामान परिस्थिती (Weather Report)

पारलमधील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, आज येथील हवामान अगदी स्वच्छ असणार आहे. आज इथे पावसाची शक्यता नाही. तथापि, येथे सूर्यप्रकाश आणि उबदारपणाची पूर्ण शक्यता आहे. पारल येथील तापमान दुपारी ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, रात्री येथील वातावरण थोडे थंड असेल. ज्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षकांना काहीसा दिलासा मिळेल. तिसऱ्या सामन्यातही नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मैदानी विक्रम पाहता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करावीशी वाटेल.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *