IND vs SA, 3rd ODI: कर्णधार केएल राहुल इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर… दक्षिण आफ्रिकेमध्ये अशी कामगिरी करणारा ठरू शकतो एकमेव भारतीय कर्णधार..

IND vs SA, 3rd ODI: KL राहुलच्या नेतृत्वाखाली भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिका बरोबरीत आहे, तर शेवटचा आणि निर्णायक सामना आज (19 डिसेंबर) बोलंड पार्कव रखेळवला जात आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाच्या नावावर मालिका होईल.

त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलकडे हा सामना जिंकून मोठी कामगिरी आपल्या नावावर करण्याची संधी आहे. केएल राहुल दक्षिण आफ्रिकेत आज इतिहास रचू शकतो.  भारताने पहिला सामना जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला.

IND vs SA live: ऋतुराज गायकवाडला वगळले, भारतीय संघाकडून 'या' युवा खेळाडूचे एकदिवशीय क्रिकेटमध्ये पदार्पण; पहा प्लेईंग 11

IND vs SA, 3rd ODI:केएल राहुल ही मोठी कामगिरी करू शकतो

जर टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय नोंदवला तर KL राहुल हा भारताचा दुसरा कर्णधार असेल ज्याने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर वनडे मालिकेत पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेत खेळताना भारताला आतापर्यंत यजमान संघाविरुद्ध केवळ एकच एकदिवसीय मालिका जिंकता आली आहे, तर २०१४ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अशा परिस्थितीत भारताने हा निर्णायक सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेतील संघाचा हा दुसरा वनडे मालिका विजय ठरेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला 2018 मध्ये फक्त एकदिवसीय मालिका जिंकता आली आहे.

 

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिका खेळली होती. त्या मालिकेत भारताला 3-0 असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत आज राहुलकडे 2021 चा हिशेब चुकता करण्याची मोठी संधी आहे. भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शनने दोन्ही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली आहेत. या सामन्यातही संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील.

असे आहेत IND-SA हेड टू हेड रेकॉर्ड

IND vs SA, 3rd ODI: केएल राहुल इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, दक्षिण आफ्रिकेमध्ये अशी कामगिरी करणारा ठरू शकतो एकमेव भारतीय कर्णधार..

दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचे वनडे रेकॉर्ड चांगले नाहीत. भारताने आतापर्यंत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 39 सामने खेळले आहेत, ज्यात केवळ 11 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर यजमान संघ २६ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. दोन सामने अनिर्णित राहिले.

जर आपण एकूण एकदिवसीय विक्रमावर नजर टाकली तर यातही दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा वरचष्मा आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये झालेल्या एकूण 93 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने 51 सामने जिंकले आहेत तर भारताने 39 सामने जिंकले आहेत. तर ३ सामने अनिर्णित राहिले.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *