IND vs SA: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषक 2023 मधील पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (IND vs SA) आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. रविवारी कोलकात्याच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. भारतीय संघ विजयाच्या रथावर स्वार होत आहे. तरदुसरीकडे उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरणार आहे.
अशा परिस्थितीत, या सामन्यात (IND vs SA) भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकतात हे जाणून घेऊया? शिवाय सामन्याची इतर माहिती देखील याद्वारे अगदी सविस्तर जाणून घेऊया..
)
IND vs SA: भारतीय संघाचे सलामीवीर
सर्व प्रथम, जर आपण भारताच्या सलामीच्या फलंदाजाबद्दल बोललो, तर शुभमन गिल सलामीवीर या भूमिकेत दिसू शकतो. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टीम इंडियाच्या शेवटच्या सामन्यात शुभमन गिलच्या बॅटने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. त्याने चिवट फलंदाजी करत भरपूर धावा केल्या. मात्र, 92 धावा करून तो बाद झाला आणि त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही.
शुभमन गिलचा जोडीदार स्वतः कर्णधार रोहित शर्मा असणार आहे. 2023 च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने शानदार फलंदाजी केली आहे. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चार धावा करून तो बाद झाला असला तरी रोहित शर्मा या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठी रोहित शर्मा त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार?
२०२३ मध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय फलंदाजांची कामगिरी चांगली दिसत आहे. खरंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय कोणताही खेळाडू आपला फॉर्म कायम राखू शकलेला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा आपल्या फलंदाजीत मोठा बदल घडवून आणू शकतो.
सुर्याकुमार यादवच्या जागी मिळू शकते ईशान किशनला संधी..
कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादवला डावलून इशान किशनला अंतिम 11 मध्ये संधी देऊ शकतो तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी श्रेयस अय्यरचा पर्याय आहे. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर तर इशान किशन सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. रवींद्र जडेजा खालच्या क्रमाने फलंदाजी करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

आता येऊया भारताच्या गोलंदाजी विभागावर.. आपण भारताच्या गोलंदाजी विभागाबद्दल (IND vs SA) बोललो तर त्यात कोणताही बदल होऊ शकत नाही. टीम इंडियाचा सामना ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे, त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला जाऊ शकतो. कारण येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी किफायतशीर मानली जाते.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटासोबत रोहित शर्मा मैदानात उतरू शकतो. कुलदीप यादवही या सामन्यात सहभागी होणार आहे. त्याला या महिन्यात खेळण्याचा खूप अनुभव आहे. रवींद्र जडेजाही गोलंदाजी करेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी असा असू शकतो भारतिय संघ:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी