IND vs SA: कसोटी संघाचा हिस्सा नसूनही रिंकू सिंग क्षेत्ररक्षण करण्यास मैदानात कसा उतरला? या नियमामुळे झाले शक्य…

IND vs SA:  भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA)  यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. या प्रतिष्ठेच्या मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना टीम इंडियाने केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर सर्वबाद 245 धावा काढल्या. प्रतीत्युरात खेळतांना दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत 5 गडी गमावून 256 धावा काढल्या. सध्या दक्षिण आफ्रिका 11 धावांनी समोर आहे.

IND vs SA: कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश नसताना देखील रिंकू सिंग मैदानात उतरल्याने सर्वच झाले आच्छर्यचकित..

भारतीय संघाचा आश्वासक खेळाडू रिंकू सिंग सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसला. रिंकूला मैदानात फिल्डिंग करताना पाहून सगळेच अवाक् झाले. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात त्याचा समावेश नसताना तो मैदानात कसा उतरू शकतो ? नक्की कोणत्या नियमानुसार तो क्षेत्र रक्षण करण्यास मैदानात उतरला? जाऊन घेऊया सविस्तर रित्या.

IND vs SA:रिंकू कोणत्या नियमानुसार मैदानात उतरला?

आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील  खेळाडूंच्या यादीत रिंकू सिंगचे नाव नव्हते.  अशा स्थितीत तो पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात कसा उतरणार? आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी केएस भरतचा १२ वा खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्याशिवाय 13 वा खेळाडू मुकेश कुमार आणि 14वा खेळाडू रवींद्र जडेजा आहे.

मग रिंकू सिंग मैदानात कोणत्या नियामुसार उतरला असा प्रश्न तुम्हलाही पडत असेल तर त्याचे उत्तर आहे ‘आयीसी सब्सटीटयूट प्लेयर्स ऑफ टेस्ट”.

आयसीसीच्या नियमांनुसार, एक संघ कसोटी सामन्यादरम्यान आपल्या संघाच्या यादीवर जास्तीत जास्त 6 खेळाडूंना पर्याय म्हणून नामांकित करू शकतो. हे संघ ज्या खेळाडूंना पर्याय म्हणून निवडतात ते खेळाडू दुखापतग्रस्त किंवा विश्रांती घेतलेल्या खेळाडूंच्या जागी सामन्यात मैदानात उतरू शकतात. विशेष परिस्थितींमध्ये, सामनाधिकारी हा नियम स्वीकारण्याचा सल्ला देतात. याच नियामुसार काल रिंकू सिंग आपल्याला मैदानात क्षेत्ररक्षण करतांना दिसला होता.

IND vs SA: कसोटी संघाचा हिस्सा नसूनही रिंकू सिंग खेत्ररक्षण करण्यास मैदानात कसा उतरला? या नियमामुळे झाले शक्य...

IND vs SA: पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिका चांगल्या स्थितीमध्ये!

सेंच्युरियन कसोटीत यजमान संघाचा वरचष्मा दिसत आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात केलेल्या 245 धावांना प्रत्युत्तर देताना आफ्रिकन संघाने दुसऱ्या दिवसअखेर 5 विकेट गमावून 256 धावा केल्या आहेत. 211 पैकी 140 धावा करून डीन एल्गर संघासाठी मैदानात आहे. यजमान संघाला आतापर्यंत 11 धावांची आघाडी मिळाली आहे.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *