IND vs SA Ist T20: पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी करावि लागणार मोठी मेहनत, दक्षिण आफ्रिकेत केवळ एवढ्याच सामन्यात जिंकू शकलाय भारतीय संघ..

IND vs SA Ist T20: पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी करावि लागणार मोठी मेहनत, दक्षिण आफ्रिकेत केवळ एवढ्याच सामन्यात जिंकू शकलाय भारतीय संघ..

IND vs SA  Ist T20: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्या, 10 डिसेंबर रोजी डर्बन, दक्षिण आफ्रिका येथे खेळवला जाईल. या सामन्याची तयारी जोरात सुरू आहे.

भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलही दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे, मात्र वेगवान गोलंदाज दीपक चहर अद्याप संघात दाखल होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाईल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघाचे प्लेईंग इलेव्हन कोणते असेलत्यावर एक नजर टाकूया..

Cricket World Cup 2023 - Shubman Gill Down With Dengue Fever, Likely To Miss India's Opener: Sources | Cricket News

भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. तो युरोप दौऱ्यासाठी गेला होता, त्यामुळे तो संघासोबत आफ्रिकेत जाऊ शकला नाही, पण आता तो आफ्रिकेत पोहोचला आहे. अशा स्थितीत त्याचे खेळणे निश्चित मानले जाते. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज दीपक चहर अद्याप दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेला नाही. वडिलांची तब्येत बिघडल्यामुळेतो संघाचा भाग बनू शकला नाही. अशा परिस्थितीत वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यास तो  या मालिकेतून बाहेर पडू शकतो.

भारतीय संघाने डर्बनमध्ये सावधपणे खेळण्याची गरज आहे. या मैदानावर भारताचा विक्रम काही खास नाही. भारतीय संघाने येथे एकूण 14 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. भारताला 9 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आणि एक सामना रद्द झाला. यावरून भारताचा या मैदानावरील रेकॉर्ड चांगला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

IND vs SA Ist T20: पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी करावि लागणार मोठी मेहनत, दक्षिण आफ्रिकेत केवळ एवढ्याच सामन्यात जिंकू शकलाय भारतीय संघ..

IND vs SA  Ist T20 साठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल/रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, इशान किशन, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव/रवी बिश्नोई.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *