IND vs SA LIVE: केएल राहुलने ठोकले शानदार शतक,महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज..

IND vs SA LIVE:  भारताचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. राहुलने 137 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 101 धावा करत आपले आठवे कसोटी शतक पूर्ण केले. राहुलने आपल्या डावात केवळ चौकारांद्वारे 80 धावा केल्या. या शतकी खेळीसह राहुलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

IND vs SA LIVE: महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मोडत केएल राहुल ठरला आफ्रिकेचा किंग.

IND vs SA Test Series: आजपासून भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरवात, पहा पहिला सामना कधी? कुठे? किती वाजता? होणार सुरु..

सेंच्युरिअमच्या मैदानावर कसोटी शतक झळकावणारा राहुल पहिला विदेशी यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. याआधी येथे सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता, ज्याने 2010 मध्ये 90 धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत भारतीय यष्टीरक्षकाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

IND vs SA LIVE: पहिल्या डावात टीम इंडियाच्या 245 धावा बोर्डवर..

प्रथम फलंदाजी करतांना टीम इंडियाने सर्व  गडी गमवून 245 धावा काढल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा राहुलने चांगली  फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. पहिल्या डावात टीम इंडियाकडून राहुल 101, विराट कोहली  (38), श्रेयस अय्यर (31),शार्दुल ठाकूर (24) यांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद 245 धावा बोर्डावर लावले.

IND vs SA LIVE: केएल राहुलने ठोकले शानदार शतक,महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज..

दक्षिण आफ्रिकेकडून कागीसो रबाडाने 5, नांद्रे बर्गरने 3, तर जेन्सन आणि Gerald Coetzee ने प्रत्येकी एक विकेट घेतला.

IND vs SA LIVE: दक्षिण आफ्रिका 111 धावांनी पाठीमागे.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, दक्षिण आफ्रीकेच्या फलंदाजांनी  132 धावा केल्या असून सध्या आफ्रिका 111 धावांनी पिछाडीवर आहे.

Dean Elgar नाबाद 80 धावावर खेळत आहे तर , त्याला David Bedingham 6 धावा काढून साथ देत आहे.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *