IND vs SA live Streaming Records: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs sa) यांच्यात रविवारी सुरू झालेल्या सामन्यात थेट प्रेक्ष पणाचा एक नवीन विक्रम तयार करण्यात आला. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर झालेल्या या मॅचला डिस्ने + हॉटस्टारवर ४.४ कोटी लोकांनी लाइव्ह पाहिले आहे. सामन्याच्या पहिल्या डावात, जेव्हा भारत फलंदाजी करत होता, तेव्हा 4.4 कोटी दर्शक एकाच वेळी Disney+Hotstar वर लाइव्ह होते. हा क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही सामन्यासाठी सर्वाधिक लाईव्ह viewership चा एक मोठा विक्रम आहे.
Our record-breaking streak continues! Here’s to many more, India! 🙌🏼🍾 #CWC23 #TeamIndia pic.twitter.com/Pq5iwyTG8v
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) November 5, 2023
नवीन विक्रम रचल्यानंतर, ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Disney+Hotstar ने चाहत्यांचे आभार मानले. यापूर्वी, 22 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान, 4.3 कोटी प्रेक्षकांनी Disney + Hotstar वर थेट सामना पाहिला होता. यापूर्वी, अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना डिस्ने + हॉटस्टारवर 3.5 कोटी प्रेक्षकांनी थेट पाहिला होता.
IND vs SA live Streaming Records वर केंद्रीय मंत्री म्हणाले , ही तर डिजिटल इंडियाची कमाल..
दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्ट्रीमिंग रेकॉर्ड आणि विराट कोहलीच्या रेकॉर्डवर आनंद व्यक्त केला. त्यांनी त्यांच्या X हँडलवर पोस्ट करत लिहले की, विराटचे शतक आणि ४.४ कोटी दर्शक. #DigitalIndia चे अप्रतिम काम.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील सामन्यात भारताचा स्टार फलंदाज आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील हे त्याचे 49 वे शतक ठरले. या शतकासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49 शतके आहेत.
विराट का शतक
और
4.4 करोड़ दर्शकIndia enjoys lowest cost of data. #DigitalIndia का कमाल।#INDvSA pic.twitter.com/9QKDKTt2Fl
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) November 5, 2023
हा सामना विराट कोहलीसाठी देखील खास होता कारण, त्याचा 35 वा वाढदिवस होता. विश्वचषक 2023 मध्ये भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व 8 सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा भारत हा पहिला संघ आहे. सध्या टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध आहे, जो येत्या रविवारी म्हणजेच १२ नोव्हेंबरला खेळवला जाईल. तो सामना जिंकून साखळी सामन्यातील सर्वच्या सर्व सामने जिंकत नंबर 1 राहण्याची कामगिरी रोहितची सेना करण्यास उत्सुक असेल.