“सूर्या दादा अंगार है..” दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत सूर्यकुमार यादवने ठोकले शानदार शतक, ठोकले तब्बल एवढे षटकार…

"सूर्या दादा अंगार है.." दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत सूर्यकुमार यादवने ठोकले शानदार शतक, ठोकले तब्बल एवढे षटकार...

सूर्यकुमार यादव: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामनाआज खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करतांना सुरवातीलाच शुभमन गिलच्या रूपाने मोठा धक्का बसला. त्यांनतर  तिलक वर्मा सुद्धा  शून्यावर बाद झाल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली.

मात्र त्यांनतर मैदानावर आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सलामीवीर यशवी जयस्वाल यांनी डाव सावरत संघासाठी धावा काढल्या. यशस्वी जयसवालने 60 धावांची शानदार खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. यशस्वी बाद झाल्यानंतर सामन्याची सर्व सूत्र सुर्यकुमार यादवने आपल्या हातात घेतले आणि शानदार फलंदाजी सुरु ठेवली.

दुसऱ्या बाजूने फिनिशर रिंकू सिंगने महत्वाची भूमिका बजावत सूर्याला जास्तीत जास्त फलंदाजी देण्याची भूमिका निभावली.

 

कर्णधार सूर्यकुमार यादवचा जलवा, तिसऱ्या टी-२० मध्ये ठोकले शानदार शतक..

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आज जबरदस्त फलंदाजी करत शानदार असे शतक ठोकले आहे. सूर्याचे हे टी-२० मधील चौथे शतक आहे. या शतकासाठी त्याने केवळ 55 चेंडू खेळलले. आपल्या या परीमध्ये त्याने तब्बल  7 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत. सूर्यान100 धावा काढून बाद झाला. भारतीय संघाचा स्कोर त्यावेळी 194-5 असा आहे.

IND vs SA : असे आहेत दोन्ही संघाचे प्लेईंग 11

"सूर्या दादा अंगार है.." दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत सूर्यकुमार यादवने ठोकले शानदार शतक, ठोकले तब्बल एवढे षटकार...

भारतीय संघातील ११ खेळाडू:- यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका संघातील 11 खेळाडू:- रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी, नांद्रे बर्गर.


हेही वाचा:

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *