IND vs SA LIVE: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज जोहान्सबर्ग येथे खेळला जात आहे. या सामन्यात आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विकेटकीपर फलंदाज केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे. या मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर साई सुदर्शन, रजत पाटीदार आणि रिंकू सिंग या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची ही मालिका खेळवली जाणार आहे. याआधी टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत संपली होती. या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 91 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रोटीजचा वरचष्मा राहिला आहे.
आफ्रिकन संघाने आतापर्यंत 50 सामने जिंकले आहेत, तर मेन इन ब्लू संघाने 38 सामने जिंकले आहेत. आफ्रिकेच्या भूमीवर आतापर्यंत भारतीय संघाने एकूण 10 सामने जिंकले आहेत.
Sai Sudarshan debut….. pic.twitter.com/xpRGgLSSZ2
— Arjun Singh Rana (@RanaAs146Rana) December 17, 2023
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झॉर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विलेम मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी.
#INDvSA both team Playing XI ✅#KLRahul pic.twitter.com/fvP4CKODnx
— Bharat 🇮🇳 (@ImAshuSingh09) December 17, 2023
भारताची प्लेइंग इलेव्हन
साई सुदर्शन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, टिळक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…