IND vs SA LIVE: कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ..
IND vs SA LIVE: आयसीसी विश्वचषक 2023 चा 37 वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA )यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही संघ आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारतीय संघ आतापर्यंत खेळलेले सर्व 7 सामने जिंकून अपराजित राहिला असून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे आफ्रिकन संघही 7 पैकी 6 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्याला स्पर्धेतील सर्वात मोठा सामना म्हटले जात आहे कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 90 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारताने 37 सामने जिंकले आहेत, तर प्रोटीज संघाने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय, वर्ल्ड कपमध्ये या दोन संघांमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी आफ्रिकन संघाने 3 वेळा, तर मेन इन ब्लूने 2 सामने जिंकले आहेत. मात्र, आता या शानदार सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (wk), टेम्बा बावुमा (c), रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, मार्को जॅन्सेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी