IND vs SA live: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मालिकेतील शेवटचा आणि तिसरा T20 सामना लवकरच सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आजही भारत त्याच संघासोबत खेळणार आहे. भारतासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे असून, या विजयासह भारत मालिकेत 1-1 अशी बरोबरी करेल.
IND vs SA : असे आहेत दोन्ही संघाचे प्लेईंग 11
भारतीय संघातील ११ खेळाडू:- यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका संघातील 11 खेळाडू:- रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी, नांद्रे बर्गर.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना जोहान्सबर्ग न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघांसह चाहत्यांनाही मोठा फटका बसला आहे. चाहत्यांना आशा होती की ते या सामन्याचा आनंद लुटतील, परंतु पावसाने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या.
याशिवाय दुसऱ्या सामन्यातही पावसाची समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे भारताचा पराभव झाला आणि दक्षिण आफ्रिकेने डीएलएस पद्धतीने सामना जिंकला. आता तिसऱ्या सामन्यात आज पावसाची समस्या निर्माण होणार नाही, अशी आशा चाहत्यांना आहे. हवामान खात्यानेही आज पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगितले.
हेही वाचा: