IND vs SA LIVE: विश्वचषक 2023 मधील आजचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात कोलकत्ताच्या मैदानावर खेळवला जात आहे.. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जबरदस्त फॉर्मात असलेला भारतीय संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने एक मोठी कामगिरी केली आहे.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सची बरोबरी केली आहे. कोलकाता येथे सुरू असलेल्या ICC विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हिटमॅनने हा विक्रम नोंदवला. भारतीय कर्णधाराने 24 चेंडूत 40 धावांची शानदार खेळी करत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
An impactful start by Rohit Sharma! He departs after a well-made 40, setting the tone for India. A solid foundation laid! 🇮🇳🏏
.
.#ICC #icccricketworldcup2023 #IndianCricketTeam #INDvsSA #IND #Trending #viral #CricketTwitter pic.twitter.com/3JBrju8Hnx— SportEx (@SportEx_in) November 5, 2023
IND vs SA: रोहित शर्मा ठरला एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू .
2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 58 षटकार पूर्ण केले आहेत. डिव्हिलियर्सने 2015 मध्येही तेवढेच षटकार मारले होते, तर प्रोटीज स्टारने त्या वर्षी 18 एकदिवसीय डाव खेळले होते, तर रोहितने 2023 मध्ये 23 एकदिवसीय डाव खेळले होते. दरम्यान, एका कॅलेंडर वर्षात ५० हून अधिक एकदिवसीय षटकार मारणारा वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (2019 मध्ये 56) हा एकमेव दुसरा फलंदाज आहे.
‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने स्पर्धेच्या सुरुवातीलाच 300 षटकार पूर्ण केले. रोहितने आपल्या 259व्या वनडेमध्ये या फॉरमॅटमध्ये 314 षटकार मारले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ गेल (331) आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी (351) यांनी सर्वाधिक षटकार मारले आहेत. सक्रिय खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल (187) रोहितच्या सर्वात जवळ आहे. भारतीयांमध्ये एमएस धोनी (२२९) रोहितच्या मागे आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी