IND vs SA ODI:  पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, 2 स्टार खेळाडू संघातून बाहेर, समोर आले मोठे कारण..

IND vs SA ODI:  पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, 2 स्टार खेळाडू संघातून बाहेर, समोर आले मोठे कारण..

IND vs SA ODI:  भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.  दोन्ही देशामधील टी-२० मालिका संपल्यानंतर आता एकदिवशिय मालिकेला सुरवात होणार आहे.  मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारतीय क्रिकेट संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. संघाचे दोन वेगवान गोलंदाज आफ्रिकन दौऱ्यातून बाहेर झाले आहेत.

IND vs SA ODI Series: उद्यापासून सुरु होणार एकदिवशीय मालिका..! पहा कोण कोण आहे संघाचा हिस्सा, तर कधी कुठे कोणता सामना खेळवला जाणार.

वेगवान गोलंदाज दीपक चहरने एकदिवसीय मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे, तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. चहर एकदिवसीय मालिकेचा भाग होता तर शमी 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत दिसणार होता.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(BCCI) एक निवेदन जारी करून दोन्ही खेळाडूंना या दौऱ्यातून वगळल्याची पुष्टी केली आहे. दीपक चहरच्या जागी आकाश दीप सिंग दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियात सामील होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

IND vs SA ODI:  पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, 2 स्टार खेळाडू संघातून बाहेर, समोर आले मोठे कारण..

रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, आकाश दीप.


हेही वाचा:

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *