IND vs SA: पहिला एकदिवशीय सामना आज, असी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग 11

IND vs SA: पहिला एकदिवशीय सामना आज, असी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग 11

IND vs SA: T20 मालिका अनिर्णीत संपल्यानंतर आता एकदिवसीय सामन्यांची पाळी आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारत आजपासून (१७ डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेला सुरुवात करणार आहे. पहिला सामना आज (17 डिसेंबर) जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. टीम इंडियाच्या खेळात अनेक नवे चेहरे पाहायला मिळतात.

IND vs SA: केएल राहुल कर्णधार असेल.

IND vs SA 1st ODI: पहिला एकदिवशीय सामना आज, केएल राहुलकडे असणार कर्णधार पद तर 'या' 3 युवा खेळाडूंना मिळणार पदार्पणाची संधी, पहा प्लेईंग 11

या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलची कर्णधारपदाची परीक्षा होणार आहे. याआधीही राहुलने अनेक वेळा टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या सामन्यात कर्णधाराशिवाय रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश होण्याची पूर्ण शक्यता आहे.

क्रिकेटर शुभमन गिलची बहिण आहे एकदम सुंदर, सौदर्याच्या बाबतीत मोठ मोठ्या अभिनेत्रींना देते टक्कर, करते हे काम.. पहा फोटो..

IND vs SA: रिंकू सिंगचे पदार्पण जवळपास निश्चित.

भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केल्यापासूनच मॅच फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या रिंकू सिंगचे या सामन्यातून वनडेमध्ये पदार्पण करणे जवळपास निश्चित आहे. रिंकू सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील सामन्यात आपल्या T20I कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले होते. रिंकू ज्या प्रकारात आहे. प्लेइंग-11 मध्ये त्याचा समावेश जवळपास निश्चित दिसत आहे.

IND vs SA: या नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

IND vs SA ODI:  पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, 2 स्टार खेळाडू संघातून बाहेर, समोर आले मोठे कारण..

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रजत पाटीदार, साई सुदर्शन आणि टिळक वर्मा यांनाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूंना प्लेइंग-11 मध्येही संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गोलंदाजीतही संघ जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजशिवाय या वनडे मालिकेत खेळणार आहे.

अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल. फिरकी गोलंदाजीत कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे, मात्र संघ दोन फिरकीपटूंसह खेळणार की तीन फिरकी गोलंदाजांसह खेळणार हे पाहणे बाकी आहे.

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग-11:

रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग.

एकदिवसीय मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

  1. १७ डिसेंबर – पहिली वनडे, जोहान्सबर्ग
  2. १९ डिसेंबर – दुसरी वनडे, पोर्ट एलिझाबेथ
  3. २१ डिसेंबर – तिसरी वनडे, पारल
  4. IND vs SA: पहिला एकदिवशीय सामना आज, असी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग 11

IND vs SA: असे आहेत दोन्ही संघ 

भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुजवेंद्र कुमार चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग, आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डी जोर्जी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, रस्सी वारेन, लिझाद विल्यम्स.


हेही वाचा:

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *