IND vs SA 1st ODI: T20 मालिकेनंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. ज्याचा पहिला सामना आज (17 Dec) वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाईल. वनडे मालिकेत भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.
IND vs SA 1st ODI: केएल राहुल सांभाळणार भारताची कमान .
या मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना टीम इंडियासाठी वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते 3 युवा खेळाडू ज्यांना या एकदिवशीय मलिकेत टीम इंडियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
IND vs SA 1st ODI: या खेळाडूंचा होऊ शकतो डेब्यू.
1. रिंकू सिंग:
T20 क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीचे पराक्रम सिद्ध करणाऱ्या स्फोटक फलंदाज रिंकू सिंगचीही दक्षिण आफ्रिकेसोबतच्या वनडे मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. अद्याप, त्याने टीम इंडियासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची त्याच्यासाठी सुवर्णसंधी असेल. रिंकू सिंगने नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रिंकूने 69 धावांची नाबाद खेळी केली. त्याची टी कामगिरी पाहून कर्णधार केएल राहुल त्याला एकातरी सामन्यात पदार्पण करण्याची संधी देईल, असी आशा रिंकूच्या चाहत्यांना असेल.
2. साई सुदर्शन
साई सुदर्शनलाही प्रथमच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनला पहिल्या सामन्यात टीम इंडियासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. आतापर्यंत साईने टीम इंडियासाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलेले नाही.साईने आयपीएलमध्ये 13 सामने खेळले असून त्यात त्याने 507 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत.
Match Day Is Here. 🤩#KLRahul | #SAvsIND | #INDvsSA pic.twitter.com/RKzuc9UGeU
— Kunal Yadav (@Kunal_KLR) December 17, 2023
3. रजत पाटीदार
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळणाऱ्या रजत पाटीदारलाही प्रथमच भारतीय वनडे संघात स्थान मिळाले आहे. मात्र, त्याला पदार्पणाची संधी मिळेल की नाही, याबाबत काहीही सांगता येणार नाही. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर रजतला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. रजत पाटीदारने आयपीएलमध्ये 12 सामने खेळले असून त्यात त्याने 404 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने आपल्या बॅटने एक शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत.
IND vs SA ODI: कधी सुरु होणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल एकदिवशीय सामना आज 17 डिसेंबर) रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 4:30 वाजतापासून सुरु होईल.
IND vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, आकाश दीप.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…