IND vs SA ODI Series: एकदिवशीय मालीका सुरु होण्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तब्बल 3 स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर..

IND vs SA ODI Series: एकदिवशीय मालीका सुरु होण्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तब्बल 3 स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर..

IND vs SA ODI Series: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. यामध्ये टी २० सामन्याची मालिका खेळली गेली असून ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.आता दौर्यातील दुसरी मालिका म्हणजे एकदिवशीय मालिका रविवार (17 डिसेंबर) पासून सुरु होत आहे. मात्र या मालिकेला सुरवात होण्याच्या आधीच यजमान दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

IND vs SA ODI Series: दक्षिण आफ्रिकेचे महत्वाचे खेळाडू मालिकेतून बाहेर..

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने केला भारताचा 5 गडी राखून पराभव, रिंकू सिंह- सूर्याची खेळी पावसामुळे गेली वाया..

टेंबा बावुमा आणि कागिसो रबाडा रविवारी  होणाऱ्या एकदिवशीय  सामन्यात सहभागी होणार होते, मात्र आता दक्षिण आफ्रिका संघाने हे दोन्ही खेळाडू या सामन्यात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बावुमाने वैयक्तिक कारणांमुळे सामन्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे आणि रबाडाच्या टाचेला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला खेळण्यात अडचणी येत आहेत.

रबाडा दुखापतीतून पूर्णपणे सावरला नाही, तर दक्षिण आफ्रिकेसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यांचे बहुतांश आघाडीचे गोलंदाज संघाबाहेर आहेत. एन्रिक नॉर्क्वे पाठीच्या दुखापतीमुळे आधीच कसोटी मालिकेतून बाहेर आहे. रबाडा दुखापतग्रस्त असल्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही, असा दावाही अन्य माध्यमांच्या वृत्तांत केला जात आहे.

दुसरीकडे, लुंगी एनगिडीलाही घोट्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रबाडाच्या टाचेला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला सामन्यातील शेवटची षटके टाकता आली नाहीत.

अन्य दोन वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि मार्को जॅन्सन यांनाही सध्याच्या टी-२० मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे. तसेच तो एकदिवसीय मालिकेतही सहभागी होणार नाही. दोन्ही वेगवान गोलंदाज प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सहभागी होतील जेणेकरून त्यांना कसोटी मालिकेची तयारी करता येईल.

IND vs SA ODI Series: एकदिवशीय मालीका सुरु होण्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तब्बल 3 स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर..

त्याच वेळी, कसोटी संघाचा कर्णधार टेंबा बावुमाने आयसीसी विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीनंतर एकही सामना खेळलेला नाही. 16 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो हाताच्या दुखापतीने त्रस्त होता. मात्र, दुखापतग्रस्त असूनही बावुमा त्या महत्त्वाच्या सामन्यात खेळायला आला होता. त्यानंतर कर्णधाराने एकही सामना खेळलेला नाही.


हेही वाचा:

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *