IND vs SA ODI Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका आता संपली आहे. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. दोन्ही संघ आता ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मालिकेतील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाईल.
दोन्ही संघांनी एकदिवसीय मालिकेसाठी आपल्या संघात युवा खेळाडूंचा समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आलेल्या केएल राहुलकडे एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व असेल. पॉवर हिटर रिंकू सिंगचा प्रथमच वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका संघाची कमान एडन मार्करामच्या हातात आहे, ज्याने टी-20 मालिकेत प्रोटीज संघाचीही कमान सांभाळली होती.
IND vs SA: केएल राहुलकडे कर्णधारपद तर संजू सॅमसन करणार पुनरागमन
साई सुदर्शन आणि रजत पाटीदार हे दोन युवा खेळाडू भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) एकदिवसीय मालिकेत पदार्पणाची वाट पाहत आहेत. या दौऱ्यावर दोन्ही खेळाडू एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतात, तर नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषकात दुर्लक्षित झालेले संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांना वनडे संघात पुनरागमन करण्यात यश आले आहे.
एकदिवसीय मालिकेच्या सामन्यांच्या वेळाही बदलल्या आहेत. हे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता सुरु होणार आहे.
IND vs SA
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) संघांनी आपापसात 91 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारताने 38 जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने 50 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. ३ सामने अनिर्णित राहिले आहेत..
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवशीय मालिकेविषयीची सर्व माहिती या प्रश्नउत्तर मध्ये जाणून घेऊया.
१.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका कधी सुरू होईल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होईल का?
२.यजमान दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ किती एकदिवसीय मालिका खेळेल?
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
३.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
४.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका कोठे खेळवली जाईल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका जोहान्सबर्ग, गकबेर्हा आणि पार्ल येथे खेळवली जाईल.
५.भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका किती वाजता खेळली जाईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना दुपारी 1:30 पासून खेळवला जाईल, तर दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना 4:30 वाजता खेळला जाईल.
६.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर कुठे पहावे?
स्टार स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका 3 वनडे मालिका थेट सामने पाहू शकता.
७.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग मोबाईलवर कुठे बघायचे?
डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर तुम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे थेट प्रवाह पाहू शकता. याशिवाय लाइव्ह अपडेट्ससाठी तुम्ही आमची वेबसाईट yuvakatta.in वर पाहू शकता.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…