Viral Video: केशव महाराज फलंदाजीस येताच लावले ‘राम सिया राम’ गाणे, केएल राहुलने दिली जबरदस्त प्रतिक्रिया, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बोलंड पार्क, पार्ल येथे खेळला गेला. या निर्णायक सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव करत मालिका २-१ ने जिंकली. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

संजू सॅमसनचा जलवा... दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले एकदिवशीय क्रिकेटमधील पहिले शतक,टीम इंडियाने जिंकली मालिका..

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 296 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 45.4 षटकांत अवघ्या 218 धावांवर आटोपला.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केशव महाराज बोलंड पार्कवर बॅटिंगसाठी येताच स्टेडियममध्ये ‘राम सिया राम’ची गाणी वाजू लागली. विकेटकीपर आणि भारतीय कर्णधार केएल राहुलने त्याला विचारले, ”

केशव भाई, तुम्ही जेव्हाही येतो तेव्हा हे गाणे वाजते.”

त्यावर केशव महाराजने स्मित हास्य केले. या दोघांचा हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

IND vs SA: भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यासह सिरीज ही जिंकली.

तिसर्या आणि निर्णायक अश्या अंतिम सामन्यात प्रतःम फलंदाजी करतांना टीम इंडियाने संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर 8 गडी गमावत 296 धावा केल्या. प्रतीत्यूरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 218 धावांपर्यंत पोहचू शकला. टीम इंडियाने हा सामना 78 धावांनी जिंकत सिरीज सुद्धा आपल्या नावावर केली आहे.

Viral Video: केशव महाराज फलंदाजीस येताच लावले 'राम सिया राम' गाणे, केएल राहुलने दिली जबरदस्त प्रतिक्रिया, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *