IND vs SA Test Series: पहिल्या कसोटीआधी भारतीय संघाला मोठा धक्का, टीम इंडियाचा स्टार सलामीवीर दुखापतीमुळे पडला बाहेर..

0
9
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IND vs SA Test Series: एकदिवशीय मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.कसोटी मालिकेतील पहिला सामना 26डिसेंबर पासून सुरु होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेसोबतच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचा स्टार सलामीवीर रुतुराज गायकवाडच्या  दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)) रुतुराज गायकवाडच्या बदलीची घोषणा केली आहे. आता कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात रुतुराज गायकवाडच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा समावेश करण्यात आला आहे. रुतुराज गायकवाड एकदिवसीय मालिकेदरम्यान जखमी झाला होता.

IND vs ENG: इंग्लंड कसोटी दौऱ्यासाठी भारताची संघाची लवकरच घोषणा, पहिल्यांदाच 6 स्पिनरसह खेळणार टीम इंडिया?

  • अभिमन्यू ईश्वरनची क्रिकेट कारकीर्द.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात रुतुराज गायकवाडच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा समावेश करण्यात आला आहे. आता अभिमन्यू टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिमन्यूची फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी झाली आहे.

सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडिया अ मध्ये अभिमन्यूचाही समावेश आहे. अभिमन्यूने प्रथम श्रेणीत 88 सामने खेळले असून त्यात त्याने 6567 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 22 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत.

IND vs SA Test Series: पहिल्या कसोटीआधी भारतीय संघाला मोठा धक्का, टीम इंडियाचा स्टार सलामीवीर दुखापतीमुळे पडला बाहेर..

याशिवाय अभिमन्यूने या यादीत केवळ 88 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 3847 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 9 शतके आणि 23 अर्धशतके केली आहेत. याशिवाय अभिमन्यूने प्रथम श्रेणीतही द्विशतक झळकावले आहे. आता अभिमन्यू टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

IND vs SA Test Series: पहिल्या कसोटीआधी भारतीय संघाला मोठा धक्का, टीम इंडियाचा स्टार सलामीवीर दुखापतीमुळे पडला बाहेर..

  • IND vs SA दुसऱ्या एकदिवशीय सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता ऋतुराज गायकवाड..

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान रुतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गायकवाड यांच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे गायकवाड मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातही खेळू शकला नाही.  या सामन्यात त्याच्या जागी रजत पाटीदारचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. रजत पाटीदारचा हा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता. सध्या रुतुराज गायकवाड बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे .

IND vs SA कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

 


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…