IND vs SA:अखेर युजवेंद्र चहलची संघात इंट्री, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरणार मैदानात; टीम इंडियाच्या एकदिवशीय संघात या खेळाडूंचा समावेश..

 

IND vs SA: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी, ODI आणि T20 मालिका खेळायची आहे. आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तिन्ही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केला आहे. त्यानंतर आता टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये तीन कर्णधार मिळाले आहेत.

याशिवाय टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाजही बऱ्याच कालावधीनंतर संघात परतला आहे. होय, आम्ही बोलतोय युझवेंद्र चहलबद्दल. चहल बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नव्हते.

IND vs SA:बऱ्याच दिवसानंतर या फिरकी गोलंदाजाची संघात इंट्री..

फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघात पुनरागमन केले आहे. त्याचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून संघात स्थान न मिळाल्याने चहल सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत चहल हरियाणासाठी शानदार गोलंदाजी करत आहे.

ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतूनही चहलकडे निवड समितीने दुर्लक्ष केले होते. यानंतर चाहत्यांनीही निवडकर्त्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. चहलचा संघात समावेश करण्याची मागणी सातत्याने होत होती. युझवेंद्र चहलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 72 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने 121 विकेट घेतल्या आहेत.

IND vs SA साठी टीम इंडियाचा एकदिवसीय संघ

केएल राहुल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, दीपक चहर, आवेश खान, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार .

IND vs SA मालिकेचे वेळापत्रक

T-20 मालिका वेळापत्रक

पहिला T20- 10 डिसेंबर (डरबन)
दुसरा टी२०- १२ डिसेंबर (केबेरा)
तिसरा T20- 14 डिसेंबर (जोहान्सबर्ग)

IND vs SA:अखेर युजवेंद्र चहलची संघात इंट्री, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरणार मैदानात; टीम इंडियाच्या एकदिवशीय संघात या खेळाडूंचा समावेश..

एकदिवसीय मालिका वेळापत्रक

पहिली एकदिवसीय – 17 डिसेंबर (जोहान्सबर्ग)
दुसरी वनडे- १९ डिसेंबर (केबेरा)
तिसरी एकदिवसीय- 21 डिसेंबर (पार्ल)

कसोटी मालीका वेळापत्रक

पहिली कसोटी- 26-30 डिसेंबर (सेंच्युरियन)
दुसरी कसोटी- ३-७ जानेवारी (केपटाऊन)


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *