IND vs SA Test Series: आजपासून (26 डिसेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सेंच्युरियन कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिलाच सामना असणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. चाहत्यांमध्येही या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे. तुम्ही या सामन्याचा थेट आनंद कोठून घेऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती आम्ही आज या बातमीमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया पहिल्या कसोटीसामन्याविषयी सविस्तर माहिती..
IND vs SA Test Series: तुम्ही येथून थेट सामने पाहू शकता
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिका भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळवली जाणार आहे. भारत सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत भारताने दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत पराभूत केल्यास गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर कायम राहील. अशा स्थितीत भारताला ही मालिका कोणत्याही किंमतीवर जिंकायची आहे.
IND vs SA कुठे पाहू शकता पहिला कसोटी सामना ?
जर तुम्हाला टीव्हीवर सामना पाहायचा असेल तर, तुम्ही तो स्टार स्पोर्ट्सवर थेट पाहू शकता. याशिवाय जर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर लाईव्ह मॅच बघायची असेल तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
IND vs SA Test Series मालिकेपूर्वी भारताला धक्का!
हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहतेही उत्सुक आहेत कारण आयसीसी विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवानंतर ही पहिलीच वेळ असणार आहे, जेव्हा चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहेत. विश्वचषकापासून कोहली आणि रोहितने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून अंतर ठेवले आहे.
अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांचा आवडता खेळाडू बऱ्याच दिवसांनी खेळताना दिसणार आहे. संपूर्ण संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. मात्र, या मालिकेपूर्वी भारताला अनेक धक्केही सोसावे लागले आहेत. भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि फलंदाज रुतुराज गायकवाड दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहेत.
IND vs SA Test Series साठी भारतीय संघ.
team India squad for the test
series against South Africa #CaptainRohitsharma #Ruturaj #INDvsSA #INDvsSA #INDvsSA #T20WorldCup2024 #rahane #SanjuSamson #Gill #DeepakChahar #RuturajGaikwad pic.twitter.com/0TNq7dhcyp— IPL lATEST NEWS (@newsipl23) November 30, 2023
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…