IND vs SA TEST SERIES: उभय संघामधील एकदिवशीय सिरीज संपली असून आता काही दिवसात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करतील. तर दुसरीकडे भारताला 31 वर्षांनंतर सुवर्ण विक्रम करण्याची मोठी संधी आहे. 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. याशिवाय दुसरा सामना ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान खेळवला जाईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) पहिला सामना 1992/93 मध्ये झाला होता.
Pick one for your test squad – Bumrah in SENA or Lyon in Asia?#AUSvsPAK | #INDvsSA | #RohithSharma𓃵 pic.twitter.com/GbqEvA8uKv
— RoHITMAN79 (@ImRoMI45) December 17, 2023
1992/93 मध्ये भारताने पहिला दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. तेव्हापासून भारताने कसोटी मालिकेसाठी ८ वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे, मात्र एकदाही त्यांना मालिका जिंकता आलेली नाही. या संपूर्ण कालावधीत भारताला केवळ एक कसोटी मालिका अनिर्णित ठेवता आली. भारत 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता, जी 1-1 अशी बरोबरीत होती.याशिवाय दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या सर्व कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी मालिकेत भारताला १-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. 4 सामन्यांच्या या मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नाही.
दोघांमध्ये एकूण 42 कसोटी सामने झाले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 15 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत, त्यापैकी भारताला फक्त 4 कसोटी मालिका जिंकता आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध 8 कसोटी मालिका जिंकल्या आहेत, तर 3 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत आगामी कसोटी मालिका कोणता संघ जिंकतो हे पाहणे बाकी आहे.
दोघांमधील शेवटची कसोटी मालिका २०२१/२२ मध्ये खेळली गेली होती. याच काळात भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही गेला होता. दक्षिण आफ्रिकेने ही ३ सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 42 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 15 सामने भारताच्या नावावर आहेत, तर 17 सामने दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहेत.
या दोघांमध्ये भारतात 7 कसोटी मालिका झाल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत एकूण 7 वेळा कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा केला आहे. यापैकी भारताने 4 मालिका जिंकल्या आहेत, 2 कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या आहेत, तर एक मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेने 1999/2000 मध्ये भारताच्या दौऱ्यावर असताना मालिका 2-0 ने जिंकली होती. म्हणजे दक्षिण आफ्रिकेने भारतात येऊन कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे, पण भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत जाऊन कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही, अशा स्थितीत भारताला सुवर्णसंधी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…