IND vs SA Test Series: पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे संकट,पहिले दोन्ही दिवस हवामान विभागाने सांगितला पावसाचा अंदाज.

0
1

IND vs SA Test Series: ODI आणि T20 नंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA ) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियनमध्ये होणार आहे. मात्र आता या सामन्यावर पावसाचा धोका निर्माण झाला आहे. पहिल्याच कसोटीत पाऊस पडला तर, पुन्हा एकदा प्रेक्षकांची हिरमोड शक्यता आहे.

पहिल्या कसोटीच्या दिवशी कसा असेल हवामान? (IND vs SA 1st test weather report)

पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर पावसाचा परिणाम होऊ शकतो. AccuWeather नुसार, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सेंच्युरियनमध्ये वादळासह पाऊस पडण्याची 96 टक्के शक्यता आहे. याशिवाय दुसऱ्या दिवशी हवामान स्वच्छ राहणार असून दुसऱ्या दिवशी पावसाची 25 टक्के शक्यता आहे.

IND vs SA: ... म्हणून ईशान किशनने कसोटी मालिकेतून नाव मागे घेतले, स्वतः केला खुलासा..

IND vs AUS : टीम इंडियासाठी कसोटी मालिका खूप खास .

आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू कसोटी मालिकेत पुनरागमन करणार आहेत. रोहित शर्मा कसोटी मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मासाठीही ही मालिका खूप महत्त्वाची आहे. आजपर्यंत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

संघाचा कर्णधार बदलू शकतो पण दक्षिण आफ्रिकेतील कोणताही कर्णधार भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून देऊ शकला नाही. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत फक्त 4 कसोटी सामने जिंकले आहेत. आता रोहित शर्माला त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला प्रथमच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकायला आवडेल.

IND vs SA Test Series: पहिल्या कसोटीसामन्यावर पावसाचे संकट,पहिले दोन्ही दिवस हवामान विभागाने सांगितला पावसाचा अंदाज.

IND vs AUS : टीम इंडियाने टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली.

कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसोबत टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली आहे. टी-२० मध्ये टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवकडे होती आणि ही मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. यानंतर केएल राहुलने वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला. आता टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here