IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे, मात्र टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते.
मागच्या शुक्रवारी ईशान किशन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाचा भाग असणार नाही, असी पोस्ट बीसीसीआय ने केली होती. मात्र त्यात त्यामागचे कारण सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे चाहत्यांना नक्की ईशान किशनला बाहेर गेलाय हे कळले नव्हते. आता मात्र स्वतः किशनने याबाबत खुलासा केला आहे.
IND vs SA: म्हणून ईशान किशन कसोटी सामने खेळत नाहीये.
एका मुलाखतीमध्ये ईशान किशनने सांगितले की, मानसिक थकव्यामुळे आपण दक्षिण आफ्रिका मालिकेतून माघार घेतली आहे. क्रिकेट मालिकेसाठी तो सतत प्रवास करत असतो , “इशानने व्यवस्थापनाला सांगितले आहे की तो मानसिकदृष्ट्या थकला आहे आणि त्याला क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे.”
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारताने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यांनी एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. आता टीम इंडिया 26 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतील दमदार कामगिरीनंतर पाहुणा संघ आता कसोटीतही अशीच कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, केएस भरत, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्ण.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…