IND vs SA : ICC विश्वचषक 2023 मधील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 37 वा सामना आज दुपारी 2 पासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ईडन गार्डन्समध्ये आज हवामान कसे असेल आणि दोन्ही संघाची प्लेईंग 11 कसी असू शकते याबद्दल आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत.
ईडन गार्डन्समध्ये हवामान कसे असेल? (IND vs SA pitch report)

हवामान खात्याने क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार कोलकात्यात पावसाची शक्यता नाही. ईडन गार्डन्समध्ये आज सूर्यप्रकाश असेल. येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील, याशिवाय किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील. पावसामुळे सामन्याचा उत्साह बिघडू नये, यासाठी चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारत सध्या विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत हा सामना या विश्वचषकातील दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये होणार आहे.
ईडन गार्डनचे मैदान फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी जवळपास सारखेच आहे. तथापि, रेकॉर्डनुसार, येथे प्रथम फलंदाजी करणारा संघ अधिक जिंकतो. येथे आतापर्यंत एकूण 37 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 21 सामने जिंकले आहेत. याशिवाय प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 15 सामने जिंकले आहेत. येथे प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 240 धावा आहे, तर नंतर फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 201 धावा आहे. अशा स्थितीत नाणेफेकही सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
या मैदानावरील सर्वांत मोठी धावसंख्या ४०४ धावांची आहे, जी भारताने श्रीलंकेविरुद्ध केली होती. हे तेच मैदान आहे जिथे रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक २६४ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत रोहितची जादू इथे पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते.
IND vs SA : असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम खेळाडू.
IND विरुद्ध SA क्रिकेट विश्वचषक सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
SA विरुद्ध IND क्रिकेट विश्वचषक सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे संभावित प्लेईंग 11: क्विंटन डी कॉक (wk), टेम्बा बावुमा (c), रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, मार्को जॅन्सेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी