IND vs SL 2nd ODI: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना 4 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाचे वनडे मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. इथून आता टीम इंडिया फक्त मालिकेत बरोबरी करू शकते. कारण मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता आणि श्रीलंकेने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.
IND vs SL 2nd ODI: 27 वर्ष जुना रेकॉर्ड मोडत श्रीलंकेने केला भारताचा पराभव.
भारतीय संघ गेल्या 27 वर्षांपासून सातत्याने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय द्विपक्षीय मालिका जिंकत आला आहे. पण आता 27 वर्षांपासून सुरू असलेला टीम इंडियाचा हा विक्रम मोडीत निघाला आहे. कारण टीम इंडिया इथून ही मालिका जिंकू शकत नाही. मालिकेत एक सामना शिल्लक आहे, जर टीम इंडियाने तो जिंकला तर मालिकेत १-१ अशी बरोबरी होईल.
भारतीय संघ शेवटचा 1997 मध्ये श्रीलंकेकडून हरला होता. त्या मालिकेत टीम इंडियाची कमान माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या हाती होती. श्रीलंकेने ही मालिका ३-० ने जिंकली. तेव्हापासून दोन्ही संघांमध्ये 11 एकदिवसीय मालिका खेळली गेली आणि टीम इंडियाने ती सर्व जिंकली आहेत.
It was a Vandersay special tonight! 🌪️
His six-wicket haul against India, a career-best, was the magic we needed.🪄 🏏 What a performance! #SLvIND pic.twitter.com/TH3PADrgfr
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 4, 2024
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाची खराब फलंदाजी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा पाहायला मिळाली. रोहित शर्मा वगळता इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 241 धावांचं लक्ष्य होतं, पण संपूर्ण भारतीय संघ 208 धावांवर गारद झाला. आणि संघाने हा सामना 32 धावांनी गमवावा लागला.
मालिकेतील शेवटचा सामना 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे तो सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे टीम इंडियाचे लक्ष असेल तर दुसरीकडे तो सामना जिंकून तब्बल 27 वर्षानंतर भारताला मालिकेत पराभूत करण्याची संधी श्रीलंकेकडे असणार आहे..