IND vs SL 2nd ODI: भारताविरुद्ध 3 सामन्यांची T20 क्रिकेट मालिका गमावल्यानंतर, यजमान श्रीलंकेच्या संघाने एकदिवसीय सामन्यात भारताला खडतर आव्हान दिले. या सामन्यात यजमान संघाने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतासोबतचा हरलेला सामना अनिर्णित ठेवला. श्रीलंकेसाठी सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा हा स्टार अष्टपैलू खेळाडू आता दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे, ज्यामुळे यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे.
Match tied! 🏏
We fought hard and bowled out India for 230 runs, ending the match in a thrilling tie! 🇱🇰🇮🇳
A great effort from both sides.#SLvIND pic.twitter.com/gVWK1kJ3DX
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 2, 2024
IND vs SL 2nd ODI: कोण आहे हा स्टार खेळाडू जो दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला?
दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडलेला स्टार खेळाडू श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू वानिंदू हसरंगा (wanindu hasaranga) आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना हसरंगाच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. एमआरआय स्कॅनमध्ये दुखापतीची पुष्टी झाल्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला (wanindu hasaranga Ruled out) आहे.
IND vs SL पहिल्या सामन्यातील वानिंदू हसरंगा (wanindu hasaranga) ची कामगिरी!
पहिल्या वनडे सामन्यात वानिंदू हसरंगाने भारतासमोर कडवे आव्हान उभे केले होते. प्रथम फलंदाजी करताना त्याने 35 चेंडूत 24 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, त्यानंतर गोलंदाजीत त्याने 10 षटकात 58 धावा देत 3 बळी घेतले. हसरंगाने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला २४ धावांवर, केएल राहुलला ३१ धावांवर आणि कुलदीप यादवला २ धावांवर बाद केले होते. हसरंगाच्या जोरावरच श्रीलंकेने भारताविरुद्धचा पहिला सामना अनिर्णित ठेवला होता.
IND vs SL: पहिला सामना रद्द झाल्यावर निराश झाला रोहित शर्मा, केले मोठे वक्तव्य..!
वानिंदू हसरंगाच्या जागी श्रीलंकेच्या संघात जेफ्री वँडरसे (Jeffrey Vandersay)चा समावेश करण्यात आला आहे. जेफ्री वँडरसेने आतापर्यंत एकूण 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 111 धावा केल्या आहेत आणि 27 बळी घेतले आहेत.
भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान यजमान श्रीलंकेचा संघ आपल्या स्टार खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्येशी झुंजत आहे. एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच दुष्मंथा चमीरा, मथिशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका यांना दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले होते. आता पहिल्या सामन्यातील स्टार परफॉर्मर वानिंदू हसरंगाच्या दुखापतीमुळे श्रीलंकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
श्रीलंका आणि भारत यांच्यातील दुसरा सामना (IND vs SL 2nd ODI) आज भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकतो.
हेही वाचा:
- Viral Video: Shamar Joseph ने ठोकला एवढा जबरदस्त षटकार की, स्टेडियमचे झाले नुकसान; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
- Asia Cup 2024: भारतीय संघाला मोठा धक्का, हा सामनावीर खेळाडू जखमी होऊन संघात पडला बाहेर..