IND Vs SL 2th ODI: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. 241 धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाचे फलंदाज श्रीलंकेचा लेगस्पिनर जेफ्री वँडरसेसमोर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह 6 फलंदाजांना बाद केले. या काळात त्याने एक मोठा पराक्रम केला आहे.
IND Vs SL 2th ODI: जेफ्री वँडरसेसने रचला इतिहास..
दुसऱ्या सामन्यापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला. स्नायूंच्या ताणामुळे वानिंदू हसरंगा संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. त्याच्या जागी जेफ्री वँडरसेचा संघात समावेश करण्यात आला. त्याने पुनरागमनाच्या सामन्यातच खळबळ उडवून दिली. त्यांच्या फिरकीसमोर कोणताही भारतीय फलंदाज काही करू शकला नाही.
या सामन्यात 6 विकेट घेत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतासाठी ५ किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो जगातील दुसरा रिस्ट स्पिनर ठरला आहे. तीस वर्षांपूर्वी असाच पराक्रम पाकिस्तानच्या मुश्ताक अहमदने केला होता. त्याने भारताविरुद्ध 36 धावांत 5 बळी घेतले होते. त्याच वेळी, आज जेफ्री वँडरसेने 6 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा:
- Viral Video: Shamar Joseph ने ठोकला एवढा जबरदस्त षटकार की, स्टेडियमचे झाले नुकसान; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
- Asia Cup 2024: भारतीय संघाला मोठा धक्का, हा सामनावीर खेळाडू जखमी होऊन संघात पडला बाहेर..