IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला 110 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासह, भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. रोहित आता सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीनसह नको असलेल्या क्लबमध्ये सामील झाला आहे. नक्की कोणता आहे तो नकोसा विक्रम जाणून घेऊया सविस्तर..!
IND vs SL: तिसऱ्या एकदिवशीय सामन्यातील पराभवासह रोहित शर्मा नको असलेल्या क्लबमध्ये सामील झाला!
खरेतर, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 2-0 असा पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या 27 वर्षात भारताविरुद्ध श्रीलंकेचा हा पहिला वनडे मालिका विजय आहे. यापूर्वी त्याने 1997 मध्ये ही कामगिरी केली होती. यासोबतच रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भारताने गेल्या ३१ वर्षांत श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे मालिका गमावली आहे. निळ्या जर्सी संघाने यापूर्वी 1993 मध्ये मालिका गमावली होती. त्यानंतर टीम इंडियाची कमान मोहम्मद अझरुद्दीनच्या हाती होती. श्रीलंकेने ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. यानंतर 1997 मध्येही श्रीलंकेच्या संघाने भारताचा पराभव केला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार सचिन तेंडुलकर होता. त्यावेळी टीम इंडियाला ३-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. आता या यादीत रोहित शर्माचे नाव जोडले गेले आहे.
श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावणारे भारतीय कर्णधार
- १९९३: मोहम्मद अझरुद्दीन
- १९९७: सचिन तेंडुलकर
- 2024: रोहित शर्मा
हेही वाचा: