IND vs SL LIVE: नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने घेतला धक्कादायक निर्णय, उपकर्णधार हार्दिक पंड्यासह उमराण मलिकसुद्धा प्लेईंग 11 मधून बाहेर तर सूर्याची दमदार इंट्री.. असा आहे भारतीय संघ..
भारत-श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या ODI मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना तिरुवनंतपुरम, केरळ येथे खेळला जात आहे. त्यापूर्वी नाणेफेक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. अशा स्थितीत टीम इंडियाला शेवटचा सामना जिंकून श्रीलंकेचा सफाया करायचा आहे.
तर पाहुण्या संघाला मान वाचवण्याची शेवटची संधी असेल. थोड्याच वेळात हा रोमांचक सामना सुरु होणार आहे. पण, त्याआधी दोन्ही कर्णधारांच्या उपस्थितीत नाणे फेकले गेले जे भारताच्या बाजूने पडले. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेविरुद्ध सलग दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने आधीच मालिका जिंकली आहे आणि शेवटच्या सामन्यातही विजय मिळवून कॅप्टनला मोहिमेचा शेवट करायचा आहे.
या सामन्याच्या प्लेइंग-इलेव्हनबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांनी काही मोठे बदल केले आहेत. भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकली तर कर्णधार रोहित शर्माने दोन मोठे धक्कादायक निर्णय घेतले आहेत. त्याने फक्त उमरान मलिक आणि उपकर्णधार हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि सूर्या यांचा प्लेईंग-इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दासून शनाकाही दोन मोठे बदलांसह मैदानात उतरला आहे.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग 11:
भारतीय क्रिकेट संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.
श्रीलंका क्रिकेट संघ: अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), अशेन बंदारा, चारिथ असालंका, दासुन शानाका (क), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, जेफ्री वेंडरसे, कसून राजिथा, लाहिरू कुमारा.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…