IND vs SL 3rd ODI Probable Playing11: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंकेसोबत 3 सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. सध्याच्या मालिकेत विश्वचषक 2023 च्या उपविजेत्या भारतीय संघाची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकण्यात संघाला यश आलेले नाही. त्यामुळे शेवटच्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (IND vs SL 3rd ODI Probable Playing11) बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंतिम एकदिवशीय सामन्यासाठी संघातील युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते.
IND vs SL 3rd ODI Probable Playing11:टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का?
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ३ वनडे मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना ७ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे होणार आहे. दरम्यान, या मालिकेत टीम इंडियाचा स्टार खेळाडू अर्शदीप सिंगची कामगिरी तितकीशी चांगली नसल्याचं बोललं जात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी फक्त एका धावेची गरज असताना त्याने मोठा फटका मारून सामना संपवण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे त्याने आपली विकेट गमावली, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पहिल्या सामन्यात त्याने गोलंदाजीत 2 बळी घेतले होते पण दुसऱ्या सामन्यात त्याला एकही बळी घेता आला नाही. त्यामुळे अखेरच्या वनडे सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
IND vs SL 3rd ODI मध्ये या युवा खेळाडूला पदार्पनाची संधी मिळू शकते!
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या खेळल्या जात असलेल्या 3 वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संधी मिळू शकते. तो अर्शदीपसिंगच्या जागी खेळतांना दिसू शकतो. गंभीर त्याला पदार्पणाची संधी देण्याचा नक्कीच विचार करेल.
असे झाल्यास, हर्षित राणाची ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा तो भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. आयपीएल 2024 मध्ये त्याने अप्रतिम कामगिरी करून कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. शिवाय गंभीर टीम इंडियाचा मुख्य कोच असल्यामुळे त्याला या अंतिम सामन्यात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
कर्णधार रोहित शर्मा देखील होऊ शकतो बाहेर..
दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा देखील अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो. दुसऱ्या सामन्यादरम्यान तो जखमी
हेही वाचा: