IND vs SL FINAL: आशिया कपच्या अंतिम सामन्यावर पावसाचे संकट, उद्या कोलंबोमध्ये दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा, पावसाने सामना नाही झाला तर का ठरणार विजेता घ्या जाणून.

IND vs SL FINAL: आशिया कपच्या अंतिम सामन्यावर पावसाचे संकट, उद्या कोलंबोमध्ये दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा, पावसाने सामना नाही झाला तर का ठरणार विजेता घ्या जाणून.


भारत आणि श्रीलंका (IND vs SL) हे संघ रविवारी १७ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) च्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत हे दोन्ही संघ आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. आशिया चषक 2023 च्या अनेक सामन्यांना पावसाचा फटका बसला आहे, त्यामुळे कोलंबोमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशी हवामान कसे असेल असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.

कोलंबोमध्ये हवामान कसे असेल?  IND vs SL Final match  weather update

भारत-श्रीलंका सामना रविवारी १७ सप्टेंबरला होणार आहे. रविवारी कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता 80 टक्क्यांपर्यंत आहे. Accuweather च्या अहवालानुसार 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 7 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. भारत-श्रीलंका सामना दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यामुळे या सामन्याबद्दल आता चाहत्यांमध्ये ही संकोच  निर्माण होतोय.

IND vs SL
IND vs SL Asia Cup Final weather update

अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

भारत-श्रीलंका अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 17 सप्टेंबरच्या खेळावर पावसामुळे परिणाम झाला तर,हा सामना 18 सप्टेंबरला खेळवला जाऊ शकतो, मात्र 18 सप्टेंबरला कोलंबोमध्येही पावसाची शक्यता आहे. 18 सप्टेंबर रोजी 69 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अंतिम सामना रद्द होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत दोन्ही दिवशी पाऊस पडल्यास भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 37 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 18 वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने येथे 16 सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांचे निकाल जाहीर होऊ शकले नाहीत. भारताने येथे प्रथम फलंदाजी करत 11 सामने जिंकले आहेत.


हेही वाचा:

4 कारणे ज्यामुळे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक ‘राहुल द्रविड’ वर्ल्डकप 2023 नंतर संघाचे प्रशिक्षक पद गमावू शकतो

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..