IND VS SL LIVE: वानखेडेवर शमी-सिराजचा कहर, श्रीलंकेवर तब्बल 302 धावांनी विजय.. टीम इंडिया थेट सेमीफायनलमध्ये..

IND VS SL LIVE: वानखेडेवर शमी-सिराजचा कहर, श्रीलंकेवर तबल 302 धावांनी विजय.. टीम इंडिया थेट सेमीफायनलमध्ये..

IND VS SL LIVE:  विश्वचषक २०२३ चा ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात २ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 330 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. सामन्यादरम्यान भारतीय फलंदाजांपाठोपाठ भारतीय गोलंदाजही जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. यामुळेच 358 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 13.2 षटकात अवघ्या 40 धावांत गडगडला.

श्रीलंकेचे पाच फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत.

IND VS SL LIVE:

आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. महत्वाचे म्हणजे श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही, अशी परिस्थिती होती. यामध्ये पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, दुशन हेमंथा आणि दुष्मंथा चमीरा यांच्या नावांचा समावेश आहे. भारताविरुद्धच्या आजच्या सामन्यात श्रीलंकेचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. संघासाठी रजिताने 17 चेंडूत 14 धावा, टेकशनाने 23 चेंडूत 12 धावा आणि मॅथ्यूजने 25 चेंडूत 12 धावांचे योगदान दिले.

भारतीय वेगवान गोलंदाजांचा कहर,श्रीलंकेची उडाली दाणादाण..

श्रीलंकेविरुद्ध भारतीय वेगवान गोलंदाज प्रभावी ठरले. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पाच षटके टाकली आणि 18 धावा खर्चून जास्तीत जास्त पाच यश मिळविले. शमीशिवाय मोहम्मद सिराजने सात षटकांत १६ धावा देत तीन बळी तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळवले.

IND VS SL LIVE: वानखेडेवर शमी-सिराजचा कहर, श्रीलंकेवर तबल 302 धावांनी विजय.. टीम इंडिया थेट सेमीफायनलमध्ये..

श्रीलंकेला हरवून टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक.

आज श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत करत टीम इंडिया विश्व चषक 2023 मध्ये सेमीफायनलसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाने गुणतालिकेत  7 पैकी 7सामने जिंकले असून ते सध्या अव्वल आहेत. या विजयासह भारतीय संघाने थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *