IND vs SL LIVE: नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या कर्णधाराने घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघाकडून या दोन युवा खेळाडूंना मिळाली T20 मध्ये पदार्पण करण्याची संधी..!
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला मास्टरकार्ड टी-20 सामना आज मुंबई येथील वानखेडे मैदानात खेळवला जात आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिल आणि शुभम मावी यांनी टीम इंडियाच्या टी-20 संघात पदार्पण केले आहे . कोच राहुल द्रविड यांनी या दोघांना डेब्यू केपं देऊन संघात स्वागत केले.
There is no specific player to root in this team😭😭
My favourites are Virat,Siraj and both are not gotta look for someone
Will Go with Sanju Bhai,Yuzi. https://t.co/sVvAipvELw
— Santo (@Sandysanto12) January 3, 2023
कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 3टी-२० सामन्यांची शृंखला खेळणार आहे. ज्यात पहिल्याच सामन्यात भारतीय संघाकडून शुभमन गिलला संधी मिळाली आहे. शुभमनने याआधी एकदिवशीय आणि कसोटी संघात डेब्यू केला होता. आणि आजच्या सामन्यात त्याने टी-20 मधून सुद्धा आपले करिअर सुरु केले आहे.
संघाकडून दुसऱ्या एका युवा खेळाडूला अंतिम 11 खेळाडूंमध्ये जागा मिळाली तो म्हणजे शिवं मावी. आयपीएलमध्ये जबरदस्त किंमत मिळालेला शुभमन याआधी भारतीय संघाकडून टी-20 मध्ये पदार्पण करू शकला नव्हता. याधीही त्याला काही सिरीज साठी संघात जागा देण्यात आली होती मात्र त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती.

मात्र या सिरीजमध्ये महत्वाचे खेळाडू सिरीज बाहेर असल्यामुळे नवीन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. आता या पदार्पणाच्या सामन्यात हे दोघे कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
शुभमन आणि शिवम मावी नंतर युवा खेळाडू संजू सेमसनला सुद्धा संघात जागा मिळाली आहे. गेल्या अनेक टी-२० सामन्यात त्याला संघात जागा मिळत नव्हती.मात्र आता रिषभपंतच्या अपघातामुळे संघात त्याला जागा मिळाली आहे. संजू सुद्धा आपल्या या सामन्यात कशी कामगिरी करतो ,हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र इतक्या दिवसांनी संधी मिळाल्यामुळे संजूचे चाहते सोशल मिडीयावर आनंद साजरा करत आहेत.
#STARAIKELUNGAL Happy new year to star sports team. [email protected] get well soon. Sanju samsan ku oru nalla chance utilise pannikuvara. Selectors Kandippa Innum rendu, moonu series chance tharanum. Sollung experts.
— Arun Msd (@ArunMsd55807575) January 3, 2023