आज (२ नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका (IND VS SL) यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामना खेळवला जात आहे. आन्नेफेक जिंकून श्रीलंकेच्या कर्णधाराने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्र दिले.
प्रथम फालंजी करतांना टीम इंडियाची कामगिरी सध्या तरी चांगली आहे. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13,500 धावा पूर्ण केल्या आहेत. मुंबईत आयसीसी विश्वचषक २०२३ च्या सामन्यात या स्टार फलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावले. कोहलीने 63व्या धावा करत 13,500 धावांचा टप्पा गाठला. याआधी तो या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 13,000 धावा करणारा फलंदाज ठरला होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13,500 हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक बनला विराट कोहली..
कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13,500 हून अधिक धावा करणाऱ्या चार खेळाडूंपैकी एक आहे. वनडे धावांच्या बाबतीत तो फक्त सचिन तेंडुलकर (18,426), कुमार संगकारा (14,234) आणि रिकी पाँटिंग (13,704) मागे आहे. विराटने आपल्या 288व्या एकदिवसीय सामन्यात हा टप्पा गाठला. अव्वल चारमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी असलेला तो एकमेव फलंदाज आहे.
इतकेच नाही तर वनडेमध्ये सर्वात जलद 13,000 धावा करण्यासोबतच कोहली सर्व फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 26,000 धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आपल्या 567 व्या डावात ही कामगिरी केली. विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला, ज्याने आपल्या 600 व्या आंतरराष्ट्रीय डावात ही कामगिरी केली होती. मास्टर ब्लास्टरने 2007 मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान हा विक्रम केला होता.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..